Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहारमध्ये ऑपरेशन लोटसप्रमाणे ऑपरेशन धनुष्यबाणही होऊ शकतं, निवडणुकीच्या निकालाआधी शिवसेनेचा इशारा

"बिहार निवडणुकीचा पूर्ण निकाल आल्यावर पक्षाकडून भाष्य केलं जाईल", अशी प्रतिक्रिया शिनसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली (Anil Parab on Bihar Election Result 2020).

बिहारमध्ये ऑपरेशन लोटसप्रमाणे ऑपरेशन धनुष्यबाणही होऊ शकतं, निवडणुकीच्या निकालाआधी शिवसेनेचा इशारा
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 6:30 PM

मुंबई : “मी निवडणुकांच्या निकालावर बोलत नाही. कारण त्याचा पूर्ण अभ्यासच झालेला नाही. प्रश्न ऑपरेशन लोटस आहे, पण तसं ऑपरेशन धनुष्यबाणही होऊ शकतं. कुणी कुणाला रोखू शकत नाही. त्यामुळे ऑपरेशन कुणी करायचं हे ज्यानेत्याने ठरवायचं. बिहार निवडणुकीचा पूर्ण निकाल आल्यावर पक्षाकडून भाष्य केलं जाईल”, अशी प्रतिक्रिया शिनसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली (Anil Parab on Bihar Election Result 2020).

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज (10 नोव्हेंबर) अनिल परब आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयाची माहिती देण्यासाठी अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बिहार निवडणुकीबाबत प्रश्न विचारला असता अनिल परब यांनी रोखठोक भूमिका मांडली.

बिहार विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. सध्या मतमोजनी सुरु आहे. मात्र, आतापर्यंतच्या समोर आलेल्या निकालानुसार भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपचा मित्रपक्ष जेडीयू 43 जागांवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी सर्वाधिक प्रचारसभा घेतल्या. त्यांनी केलेल्या प्रचाराचा फटका जेडीयूला बसला.

जेडीयू फक्त 43 जागांवर आघाडीवर दिसत असल्याने यावेळी मुख्यमंत्री भाजपचा असण्याची शक्यता आहे. कारण भाजप बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकून मोठा पक्ष बनण्याच्या तयारीत आहे. पण महाराष्ट्रात गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचं जसं बिनसलं तसं जेडीयूसोबत बिनसलं तर बिहारमध्ये वेगळं समीकरणंही दिसू शकतं. त्यावेळी सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप ऑपरेशन लोटसचा अवलंब करु शकतं. पण तशी शक्यता कमी आहे, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे (Anil Parab on Bihar Election Result 2020).

बिहार निवडणुकीत शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मतं

बिहार विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात शिवसेना हिरीरीने उतरली होती. मात्र सेनेला मतदारांनी नाकारल्याचे दिसत आहे. कारण शिवसेनेच्या ‘तुतारी वाजवणारा मावळा’ या चिन्हासमोरील बटणापेक्षा मतदारांनी ‘नोटा’चे बटण अधिक दाबले आहे. शिवसेनेच्या उमेदवारांना o.o4 टक्के मतं मिळाल्याचं सुरुवातीच्या मतमोजणीत दिसत होतं.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार दुपारी 1.45 वाजेपर्यंत आलेल्या निकालाच्या कलांनुसार शिवसेनेला 23 पैकी 21 जागांवर ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. शिवसेनेने 50 उमेदवार देण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात 23 जागांवरच निवडणूक लढवली.

विशेष म्हणजे राजदचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेल्या तेजस्वी यादव यांच्या राघोपूर मतदारसंघातही शिवसेना डेंजर झोनमध्ये आहे. म्हणजेच शिवसेनेच्या बहुतांश उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Bihar Election Result 2020 | बिहारमध्ये 23 पैकी 21 जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतं!

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.