रात्रीच्या कोरोनाबाबत प्रश्न विचारणाऱ्यांची कीव येते, शिवसेनेचा मनसेवर पलटवार

"रात्रीचाच कोरोना असतो का? अशाप्रकारचे प्रश्न विचारणाऱ्यांची मला कीव येते, अशी टीका अनिल परब यांनी केली (Anil Parab slams MNS).

रात्रीच्या कोरोनाबाबत प्रश्न विचारणाऱ्यांची कीव येते, शिवसेनेचा मनसेवर पलटवार
अनिल परब, परिवहन मंत्री
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 3:02 PM

मुंबई : ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रजातीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नाईट कर्फ्यू (Night Curfew) लागू करण्यात आला आहे. मात्र, या नाईट कर्फ्यूवरुन मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला रात्रीचाच कोरोना असतो का? असा सवाल केला होता. त्यांच्या या प्रश्नाला शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी उत्तर दिले. त्यांनी राज्यातील सध्याच्या घडामोडींवर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मनसेवर सडकून टीका केली (Anil Parab slams MNS).

“रात्रीचाच कोरोना असतो का? अशाप्रकारचे प्रश्न विचारणाऱ्यांची मला कीव येते. मी तर असं म्हणतो, सगळ्यांनी मिळून जबाबदारी घ्यावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहून द्यावं की कोरोनाचा फैलाव होणारच नाही. मग विचार करता येईल की, रात्री किंवा दिवसा काय करायचं ते. मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रत्येक पावलं लोकांच्या काळजीसाठी आणि लोकांच्या हिताची आहेत.”, असं अनिल परब म्हणाले.

“मनसेचं टीका करणं हेच काम आहे. दुसरं कोणतं काम त्यांच्याकडे राहिलेलं नाही. टीका करणाऱ्यांना टीकाच करायची आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संपूर्ण महाराष्ट्र राज्याची जबाबादारी सांभाळायची आहे. अर्थचक्र देखील व्यवस्थित चाललं पाहजे. येणारे काही दिवस जगासाठी धोक्याचे दिवस असण्याची शक्यता आहे. ब्रिटनहून येणारा कोरोना व्हायरस लक्षात घेऊन याबाबत उपययोजना केल्या जात आहेत. मुख्यमंत्री याबाबत काळजी घेत आहेत. त्याचबरोबर जे कामकाज सुरु झालं आहे ते थांबणार नाही, याचीदेखील काळजी घ्यावी लागत आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“वर्षअखेरीस ख्रिसमस किंवा नव्या वर्षानिमित्ताने रात्रीच्यावेळी फार मोठ्या प्रमाणात गर्दी होती. अशावेळी कोरोनाचा संक्रमण वाढू नये यासाठी रात्रीचा कर्फ्यू लावला आहे”, असं परब यांनी सांगितलं.

“औरंगाबादला संभाजीनगर म्हणावं ही भूमिका शिवसेनाप्रमुखांनी वेळोवेळी जाहीर केलेली आहे. आम्ही आजही त्याला संभाजीनगरच म्हणतो. या सर्व गोष्टी मनात असल्या पाहिजेत. आम्ही या सगळ्या गोष्टी कृतीतून दाखवल्या आहेत. आता निवडणुकीच्या तोंडावर हे सर्व विषय घेऊन येत आहेत. पण याची सुरुवात आम्ही कित्येक वर्षांपूर्वी केली आहे”, असं मत त्यांनी मांडलं.

“औरंगाबाद शहराचं नामकरण 26 जानेवारीपर्यंत करुन दाखवा नाहीतर असं आव्हान मनसेकडून देण्यात आलं आहे. पण त्यांचे असे बरेच नाहीतर आम्ही बघितले आहेत. अशा धमक्यांना भीक घालत नाही. संभाजी हे नाव आमच्या हृदयात आहे. त्यामुळे आम्ही पूर्वीपासून संभाजीनगर असंच म्हणतो. राजकारणासाठी हा विषय उकरुन काढणं हा वेगळा विषय आहे. पण पूर्वीपासून भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर कायम आहोत”, असं अनिल परब म्हणाले.

संबंधित बातमी :

मुख्यमंत्री, कोरोना काय फक्त रात्री फिरतो का? नाईट कर्फ्यूवर मनसे नेत्याची सडकून टीका

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.