Anil Parab : कामगारांकडून उकळलेला पैसा बाहेर निघणार का?, अनिल परब म्हणतात…

कोविड महामारीमुळे आधीच एसटीची चाके थांबली होती, त्यात कामगारांच्या संपामुळे राज्यभरात एसटी पूर्णपणे बंद झाली. मात्र, सर्वसामान्यांची एसटी लवकरच पूर्ववत होईल. संपकरी कामगार कामावर हजर झाल्यानंतर एसटी लोकांच्या सेवेला जाण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती परिहवन मंत्री अनिल परब यांनी आज दिली.

Anil Parab : कामगारांकडून उकळलेला पैसा बाहेर निघणार का?, अनिल परब म्हणतात...
अनिल परब, परिवहन मंत्रीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 9:26 PM

मुंबई : कोविड (corona) महामारीमुळे आधीच एसटीची चाके थांबली होती, त्यात कामगारांच्या (employee) संपामुळे राज्यभरात एसटी पूर्णपणे बंद झाली. मात्र, सर्वसामान्यांची एसटी लवकरच पूर्ववत होईल. संपकरी कामगार कामावर हजर झाल्यानंतर एसटी (ST) लोकांच्या सेवेला जाण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी दिलासादायक माहिती परिहवन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब (Anil Parab) यांनी आज दिली. माननीय उच्च न्यायालयाने एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिल, 2022 पर्यंत कामावर रूजू होण्याचे निर्देश दिले आहेत. त्या पार्श्वभूमिवर सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी पूर्ववत सुरु होण्यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी सोमवारी मंत्रालयातील आपल्या दालनात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर मंत्री, ॲड. परब यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, संपामुळे गेले 5 महिने एसटीच्या गाड्या उभ्या होत्या. यापैकी काही गाड्या नादुरूस्त असतील त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी लागणार आहे. तसेच कोविड आणि संपामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये एसटीचे मार्ग विस्कळीत झाले असल्याने काही मार्गही ठरवावे लागणार आहेत. त्यामुळे कोविडपूर्व काळात जी परिस्थिती होती त्या परिस्थितीवर मात करीत पुन्हा एसटी नव्या दमाने सुरु करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.

हल्याप्रकरणी कारवाई होणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या घरावर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याची गंभीर दखल यावेळी घेण्यात आली. शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचेही मंत्री, ॲड.परब यांनी सांगितले. त्यांच्यावरील गुन्ह्याचे स्वरूप बघून शिस्त आणि आवेदन पद्धतीनुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

एसटीसाठी उपाययोजना कराव्या लागणार

संपकरी कामगार कामावर हजर झाल्यानंतर एसटी लोकांच्या सेवेला जाण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी दिलासादायक माहिती परिहवन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी आज दिली. संपामुळे गेले 5 महिने एसटीच्या गाड्या उभ्या होत्या. यापैकी काही गाड्या नादुरूस्त असतील त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी लागणार आहे. तसेच कोविड आणि संपामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये एसटीचे मार्ग विस्कळीत झाले असल्याने काही मार्गही ठरवावे लागणार आहेत. त्यामुळे कोविडपूर्व काळात जी परिस्थिती होती त्या परिस्थितीवर मात करीत पुन्हा एसटी नव्या दमाने सुरु करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती परब यांनी दिली.

इतर बातमी

SRH vs GT IPL 2022: अविश्वसनीय! शुभमन गिल तरी काय करणार? राहुलने कव्हर्समध्ये घेतलेला फ्लाईंग कॅच एकदा पहाच VIDEO

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंनी पैसे घेतल्याचा स्वारगेटमधील एसटी कर्मचाऱ्याचा दावा, गोळा करायला कुणी सांगितले?

Video : महिला झेडपी सदस्याच्या पतीची शिव्या देत तरुणांना मारहाण, नागपूरच्या उमरेड परिसरात राडा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.