निकाल लागणार अन् दादा भाजपसोबत येणार? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचा निकाल काय लागणार याकडे फक्त सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही नजरा आहेत. पण अंजली दमानियांच्या एका ट्विटनं खळबळ उडाली. शिंदेंचे आमदार अपात्र होणार आणि अजित पवार भाजपसोबत जाणार, असा दावाच दमानियांनी केलाय.

निकाल लागणार अन् दादा भाजपसोबत येणार? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 11:11 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे आमदार अपात्र होणार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाणार, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. दमानियांनी आधी एक ट्विट केलं आणि चर्चेला फोडणी दिली. आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गंमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत, आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची तेही लवकरच बघू.

दुसरीकडे स्वत: अजित पवारांनी, मात्र अंजली दमानियांचा दावा फेटाळलाय. दमानिया चुकीचं बोलतायत, असं अजित पवार म्हणालेत. आता हा दावा करण्यामागे अंजली दमानियांनी, ईडीच्या आरोपपत्राचाही दाखला दिलाय. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडीनं आरोपपत्र दाखल केलंय. या आरोपपत्रात अजित पवार आणि पत्नी सुनेत्रा पवारांची नावं नाहीत. अर्थात पुरवणी आरोपपत्र दाखल करुनही अजित पवारांचं नाव येऊ शकतं आणि हे अजित पवारांवर दबाव टाकण्यासाठी भाजप ठरवून करत असल्याचा आरोप दमानियांचा आहे. तर आपल्याला कोणतीही क्लीनचिट मिळालेली नाही, चौकशी सुरु आहे असं अजित पवारांनी सांगितलं.

सत्तासंघर्षाचा निकाल कधीही येऊ शकतो. शिंदेसह 16 आमदार अपात्र झाले तर सरकारच कोसळेल आणि त्यामुळं अजित पवार हा भाजपचा प्लॅन बी असल्याचं अंजली दमानिया सांगतायत. 2019च्या निकालानंतर अजित पवारांसोबत भाजपचा प्रयोग झालाय.

हे सुद्धा वाचा

अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या?

अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदावरुन फिस्कटल्यानंतर, ठाकरेंनी भाजपची साथ सोडली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा 3 पक्षांची महाविकास आघाडीसाठी बोलणी सुरु होती. मुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचं नाव चर्चेत असल्याचंही जाहीर केलं. पण त्याचवेळी अजित पवारांनी गट नेता म्हणून भाजपला पाठींबा देत असल्याचं पत्र राज्यपालांना दिलं आणि पहाटेचा शपथविधी घेत फडणवीसांनी मुख्यमंत्री तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

मात्र 72 तासांतच अजित पवार माघारी फिरले. त्यामुळं फडणवीसांचं सरकार कोसळलं आणि आता पुन्हा, शिंदेंचे आमदार अपात्र झाल्यावर, अजित पवार फडणवीसांच्या मदतीला धावतील असं दमानियांना वाटतंय. विशेष म्हणजे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातलं ट्विट करण्याआधी म्हणजे 8 एप्रिललाही त्यांनी मी पुन्हा येईन अशी टॅगलाईन देत ट्विट केलंय. त्या ट्विट सोबत फडणवीस-अजित पवारांचा शपथविधीचा फोटोही पोस्ट केलाय.

आता प्रश्न आहे की, भाजपला काय वाटतंय? जर तरला काहीही अर्थ नाही. निकालाआधीच बोलणं हा सुप्रीम कोर्टाचा अवमान आहे, असं बावनकुळे म्हणालेत. राजकारणात कोणत्याही शक्यतेला 100 टक्के वाव असतो. कारण राजकारणात काहीही होऊ शकतं. त्यामुळे दमानियांच्या भविष्यवाणीचा निकालही जवळच आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.