पराभव दिसल्यावर माणूस चवताळतो, दानवेंची अवस्था तशीच झालीय : खोतकर

जालना : लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसे राजकीय नेते एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप करु लागले आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि जालन्याचे खासदार रावसाहेब दानवेंनी केलेल्या टीकेला राज्याचे दुग्धविकास आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकरांनी टीकेला उत्तर देताना म्हटले, “खरंतर एखाद्या माणसाला आपला पराभव दिसला की माणूस चवताळतो, मग त्यातून काहीही बरळतो, दानवेंची अवस्था तशीच झालीय.” अर्जुन खोतकर […]

पराभव दिसल्यावर माणूस चवताळतो, दानवेंची अवस्था तशीच झालीय : खोतकर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

जालना : लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसे राजकीय नेते एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप करु लागले आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि जालन्याचे खासदार रावसाहेब दानवेंनी केलेल्या टीकेला राज्याचे दुग्धविकास आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकरांनी टीकेला उत्तर देताना म्हटले, “खरंतर एखाद्या माणसाला आपला पराभव दिसला की माणूस चवताळतो, मग त्यातून काहीही बरळतो, दानवेंची अवस्था तशीच झालीय.”

अर्जुन खोतकर पुढे म्हणाले, आपले कोण, परके कोण, हे समजायला दानवे तयार नाहीत. आम्ही एवढी वर्षे त्यांच्यासाठी मदतच करीत गेलो आहोत. एवढं करुनही त्यांना कळत नसेल, तर निश्चितपणे ही निवडणूक आणि निवडणुकीचे वातावरण त्यांना कळून चुकलेले आहे. त्यांच्या पायाखालची वाळू आता घसरलेली दिसते. त्यामुळे ते काहीपण बरळायला लागले आहेत.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेनी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार आणि राज्याचे दुग्धविकास पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकरांवर अस्सल ग्रामीण भाषेत चौफेर टीका केली होती. जालना जिल्ह्यातील अंवड तालुक्यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन करण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आले असता, त्यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार याच्यावर टीका केली होती.

निवडणुकीचं जसजसं वारं वाहू लागलं आहे, जालना जिल्ह्यातील राजकारण तापू लागलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले खासदार रावसाहेब दानवे आणि राज्याचे मंत्री व शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यातील हाडवैर पुन्हा वर आलं आहे. दोघांनी एकमेकांवर शरसंधान साधण्याची एकही संधी सोडली नाहीय. त्यात आता लोकसभा निवडणुकीत शिवसेना स्वबळावर उतरण्याची शक्यता निर्माण झाल्याने अर्जुन खोतकरांनी आपल्या टीकेची धार आणखी तीक्ष्ण केली आहे. त्यामुळे दानवे विरुद्ध खोतकर असा अटीतटीचा सामना जालनाकरांना पाहायला मिळतोय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.