नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांनी निष्ठेच्या गप्पा माराव्या? : अर्जुन खोतकर
"नारायण राणे यांनी आपण काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे", असा सल्ला अर्जुन खोतकर यांनी दिला (Arjun Khotkar on Narayan Rane).
मुंबई : “ज्या शिवसेनाप्रमुखांनी राणे यांना मुख्यमंत्री केलं, पूर्ण हयात सत्ता दिली, त्या शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत नारायण राणे यांनी खंजीर खुपसलं. त्यांनी निष्ठेच्या गप्पा मारायच्या?”, असा सवाल शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केला. “नारायण राणे यांनी आपण काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे”, असा सल्लादेखील त्यांनी दिला (Arjun Khotkar on Narayan Rane).
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात भाजप नेते नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. यावर नारायण राणे यांनी आज (26 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. नारायण राणेंच्या टीकेवर अर्जुन खोतकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली (Arjun Khotkar on Narayan Rane).
“महाराष्ट्राला पुन्हा एकदा सुसंस्कृतपणाचं दर्शन घडलं आहे. नारायण राणे ज्या संस्कृतीत वाढले त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार? ते अशाच पद्धतीने बोलतात. संपूर्ण महाराष्ट्राला त्याची कल्पना आहे. ते आणि त्यांचे मुलं कुणाचीही लायकी काढणं, खाली पाडून बोलणं यामध्ये धन्यता मानतात”, असा टोला अर्जुन खोतकर यांनी लगावला.
“एखादा माणूस गांजा पिवून बोलतो तसं यांचं वक्तव्य होतं. मुख्यमंत्र्यांना शेलक्या भाषेत, एकेरी बोलले. हे महाराष्ट्राच्या जनतेला न आवडणारं आहे. महाराष्ट्राची जनता अशाप्रकारच्या लोकांना कधीच खपून घेत नाही. त्यामुळे मी त्यांच्या भाषेचा निषेध व्यक्त करतो”, असं खोतकर म्हणाले.
“तुम्ही चुका असतील तर योग्य पद्धतीने मांडा. चुका लक्षात आणून द्या. त्यांनी कोणत्या पुराव्यांच्या आधारावर अशाप्रकारे भाषण केलं, याची एनसीबीने चौकशी केली पाहिजे”, अशी भूमिका अर्जुन खोतकर यांनी मांडली.
संबंधित बातम्या
उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी राहण्याची लायकी नाही, नारायण राणेंचा हल्लाबोल
दादागिरी केली तर ‘मातोश्री’च्या आतलं-बाहेरचं सगळं बाहेर काढेन : नारायण राणे