2021 पासून शिवसेनेची घोषणा ‘पहले मदिरायल बाद में मंदिर’, शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला

भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यांवर जोरदार निशाणा साधलाय. सन 2019 पर्यंत शिवसेनेची घोषणा होती, "पहिले मंदिर बादमें सरकार" तर 2021 ला शिवसेनेची घोषणा बदलली आणि " पहिले मदिरालय बाद मे मंदिर!" असा सणसणीत टोला आमदार आशिष शेलार यांनी लगावला.

2021 पासून शिवसेनेची घोषणा 'पहले मदिरायल बाद में मंदिर', शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला
आमदार आशिष शेलार, भाजप
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 3:46 PM

मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहीहंडी आणि गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट्स सुरु आहे. मात्र, मंदिरं उघडण्याचा निर्णय अद्याप विचारात नसल्याचं महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यावरुन भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यांवर जोरदार निशाणा साधलाय. सन 2019 पर्यंत शिवसेनेची घोषणा होती, “पहिले मंदिर बादमें सरकार” तर 2021 ला शिवसेनेची घोषणा बदलली आणि ” पहिले मदिरालय बाद मे मंदिर!” असा सणसणीत टोला आमदार आशिष शेलार यांनी लगावला. (Ashish Shelar criticizes CM Uddhav Thackeray and ShivSena over temples)

माननीय मुख्यमंत्री महोदय, म्हणत आहेत, आमचा सणांना विरोध नाही आमचा करोनाला विरोध आहे. गर्दी जमू नये असे वाटते मग मुंबईतले राज्यातले रेस्टॉरंट, बार, पब, येथे जमणाऱ्या गर्दीचे काय? आज आम्हाला केंद्राचे पत्र दाखवताय केंद्राच्या पत्रात बार, पब इथे गर्दी होणार नाही असे म्हटलेय का? आणि म्हणून केंद्राच्या पत्रकावरच तुम्ही राजकारण करणार असाल तर, केंद्राने तुम्हाला सांगितलं होतं टेस्ट वाढवा, वाढवल्यात का? मृत्यूचे आकडे लपवू नका, काय केलेत? केंद्राने सांगितलं होतं की, लसी समप्रमाणात राज्यभर द्या, मग जालन्याला सगळ्यात जास्ती लसी का गेल्या? ठाण्याच्या महापौरांनी आणि तुमच्या पक्षाच्या विधानपरिषदेचे आमदारांना रांग तोडून अगोदर लस कशा मिळाल्या? केंद्राने सांगितल्याप्रमाणे आरोग्य सेवकांचे लसीकरण संपूर्ण करा, अद्यापही हे झालेले नाही. केवळ सिलेक्टीव्ह राजकारण करू नका. सन 2019 पर्यंत शिवसेनेची घोषणा होती, “पहिले मंदिर बादमें सरकार” तर 2021 ला शिवसेनेची घोषणा बदलली आणि ” पहिले मदिरालय बाद मे मंदिर!”, अशी घणाघाती टीका शेलार यांनी केलीय.

अटक,धरपकड करायला गोविंदा काय लादेन आहे का?

काल दिवसभर गोविंदाला नोटीस काय, धरपकड काय, बलाचा वापर काय, अटक काय, या सगळ्या गोष्टीचा काल महाराष्ट्रात आणि मुंबईत घडल्या. जणू काही सुलतानी पद्धतीचा कारभार सुरु होता. ज्यावेळी सचिन वाझेचा प्रश्न सभागृहात आम्ही मांडला, करोडोंची वसुली केल्यानंतर ज्यावेळी आम्ही प्रश्न उपस्थित केला, तेव्हा सचिन वाझे लादेन आहे काय? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला होता. आज आमचा मुख्यमंत्र्यांनाही तोच सवाल आहे. अटक, धरपकड करायला गोविंदा काय लादेन आहेत काय?, असा संतप्त सवाल शेलार यांनी केला. ज्या पद्धतीने गोविंदांच्या विरोधात बलाचा वापर करून, अटक करून, धरपकड करून, नोटीस देऊन, केसेस टाकताय म्हणून हा सवाल आम्ही तुम्हाला विचारतोय, असंही ते म्हणाले.

महाराष्ट्राला बंदीवान केल्याचा विक्रम

गेल्या दीड पावणे दोन वर्षांमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने, ठाकरे सरकारने, सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. पावणे दोन वर्षात महाराष्ट्राला बंदीवान केल्याचा रेकॉर्ड हा उद्धव ठाकरे यांच्या नावावर लिहिला जाईल, असे दुर्दैवी चित्र आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

‘संजय राऊत यांना अंतर्गत धोका असवा’

खासदार संजय राऊत यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे चांगले आहे. ते नेते आहेत, संपादक आहेत. नेहमी पुढे बोलताना दिसतात, त्यामुळे पक्ष कोण चालवतो हेही दिसतेय. बहुतेक त्यामुळेच त्यांना बाहेरून नाही तर अंतर्गत धोका असवा म्हणून त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली असावी, असा टोला याबाबत विचारल्या प्रश्नावर त्यांनी लगावला.

इतर बातम्या :

दहीहंडी किंवा श्रीकृष्ण हा काय राजकीय अजेंडा आहे का? बाळा नांदगावकरांचा गृहमंत्र्यांना सवाल

मुंबईतील ‘त्या’ नऊ मजली इमारतीशी तुमचा संबंध काय?; किरीट सोमय्यांचा भुजबळांना सवाल

Ashish Shelar criticizes CM Uddhav Thackeray and ShivSena over temples

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.