पूरग्रस्तांना पॅकेज म्हणजे वृत्तपत्रातील प्रसिद्धीची बातमी; मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरविला, आशिष शेलारांचा टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांना मदत करू असं सांगितले होतं. मात्र, त्यांनी पॅकेज घोषित केल्यानं मुख्यमंऱ्यांनी दिलेला शब्द फिरवला आहे. त्यांनी शब्द पाळून पूरग्रस्तांना योग्य ती मदत करावी, असा टोला भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

पूरग्रस्तांना पॅकेज म्हणजे वृत्तपत्रातील प्रसिद्धीची बातमी; मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरविला, आशिष शेलारांचा टोला
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 2:51 PM

धुळे : राज्य सरकारने पूरग्रस्तांना दिलेलं पॅकेज हे वर्तमानपत्रातील प्रसिद्धीची बातमी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांना मदत करू असं सांगितले होतं. मात्र, त्यांनी पॅकेज घोषित केल्यानं मुख्यमंऱ्यांनी दिलेला शब्द फिरवला आहे. त्यांनी शब्द पाळून पूरग्रस्तांना योग्य ती मदत करावी, असा टोला भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे. शेलार आज धुळ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. (Ashish Shelar criticizes Maha Vikas Aghadi government over flood relief)

तसंच मुंबईच्या विमानतळाच्या नावाबाबत विचारलं असता शेलार म्हणाले की, छत्रपती शिवरायांचे नाव कुणीही हटवू शकत नाही. ते नाव भाजपच्या काळातच दिलं गेलं आहे. त्याचा ठराव राज्य सरकारने पारीत केला आहे. अदानीचा ठराव पारीत करून राज्य सरकारने अदानीला छत्रपती शिवरायांचे नाव झाकन्याची संधी दिली आहे का? असा सवालही शेलार यांनी केलाय. तसंच नवाब मलिक हे अदानीचे जवळचे मित्र आहेत. त्यांनी हिंमत असेल तर ठराव रद्द करावा, असं आव्हानच शेलार यांनी राज्य सरकारला दिलंय.

लॉकडाऊनबाबत शासनाची दुट्टपी भूमिका

राज्य सरकारने लॉकडाऊनबाबत दिलेली शिथिलता आहे की जनतेची छळवणूक आहे, हे नागरिकांनाही कळत नाही. तसंच राज्य सरकारच्या मंत्र्यांनाही कळत नाही. लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमध्ये प्रवास दिला जात नाही. याबाबत उच्च न्यायालयाने देखील सवाल विचारला आहे. एकीकडे सर्व सामान्यांना प्रवास द्यायचा नाही, दुसरीकडे शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने भरणार. ही शासनाची दुट्टपी भूमिका असल्याची टीका शेलार यांनी राज्यातील लॉकडाऊनच्या स्थितीवरुन केलीय.

भ्रष्टाचाऱ्यांचे आश्रय दाते सरकार

राज्याचे सरकार हे भास्कर वाघ सारख्या भ्रष्टाचाऱ्याचे आश्रय दाते सरकार आहे. लुटो, बाटो आणि खाओ असे हे तिघाडी सरकार असल्याचा घणाघात शेलारांनी केलाय. तसंच या सरकारमध्ये पोलिसांच्या बदल्यामध्ये दलाली सुरु आहे. त्यामुळे पोलिसांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील अनेक अधिकारी केंद्राच्या सेवेत सामिल झाले आहे. त्यामुळे राज्याची व्यवस्था कोलमडली आहे. हे सरकार शेतकऱ्यांचं नसून भ्रष्टाचाऱ्यांचं असल्याची टीकाही शेलारांनी केलीय. राज्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आदिवासी समाजाच्या खावटी योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचं शेलार म्हणाले. हे सरकार म्हणजे तीन कारभारी आणि रोज बदला अधिकारी, असं असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय.

तसंच राज्याचे राज्यपाल कुठलेही असंविधानिक काम करत नाहीत. सरकार काम करण्यात कूचकामी ठरत असल्याने राज्यपाल काम करत असल्याचा दावाही त्यांनी केलाय. राज्य सरकार फक्त राज्यपालांवर टीका करण्याचं काम सध्या करत असल्याची टीका शेलारांनी केलीय.

संबंधित बातम्या :

ठाकरे सरकारचं पॅकेज 11 हजार 500 कोटींचं, पण प्रत्यक्ष तातडीची मदत 1500 कोटींचीच, फडणवीसांचा दावा

आघाडी सरकार शेतकऱ्यांचे नाही, तर घोटाळेबाज “धर्मभास्कर वाघांचे” आश्रयदाते : आशिष शेलार

Ashish Shelar criticizes Maha Vikas Aghadi government over flood relief

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.