पवारांच्या भेटीसाठी शेलार ‘सिल्व्हर ओक’वर पोहोचले, पण भेटलेच नाही, पाहा नेमकं काय झालं…

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी 'सिल्व्हर ओक'वर जात होते. पण...

पवारांच्या भेटीसाठी शेलार 'सिल्व्हर ओक'वर पोहोचले, पण भेटलेच नाही, पाहा नेमकं काय झालं...
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 4:12 PM

मुंबई : मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी ‘सिल्व्हर ओक’वर जात होते.  मात्र माध्यम प्रतिनिधींनी पाहिल्यानंतर त्यांनी ही भेट घेणं टाळलं. आशिष शेलार यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) घरी न जाता बाहेरुनच आपला मोर्चा माघारी वळवला. सिल्व्हर ओकवर मुंबई क्रिकेट असोसिएशन कार्यकारिणीच्या निवडणुकीसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीला BCCI चे माजी सचिव प्रोफेसर रत्नाकर शेट्टी, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. पी व्ही शेट्टी आणि आशीष शेलारही उपस्थित राहणार होते. मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कमालीचा राजकीय संघर्ष सुरू असताना आशीष शेलार यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला असता म्हणून त्यांनी ही भेट टाळल्याची माहिती आहे.

बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी सिल्व्हर ओकच्या बाहेर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आधीच कॅमेरासह तैनात असल्याचे लक्षात येताच, सिल्व्हर ओकपासून अगदी हाकेच्या अंतरावर आशीष शेलार यांनी आपल्या गाडीचा मार्ग अगदी एका झटक्यात बदलला आणि ते पुढे निघून गेले.

मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.