VIDEO: पंकजा मुंडेंचं दबावतंत्र नाही, त्या असं काही करणार नाहीत: आशिष शेलार

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या नाराज समर्थकांची वरळी निवासस्थानी बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच भाजप नेते आशिष शेलार यांनी मोठं विधान केलं आहे. (ashish shelar)

VIDEO: पंकजा मुंडेंचं दबावतंत्र नाही, त्या असं काही करणार नाहीत: आशिष शेलार
ashish shelar
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 11:48 AM

कोल्हापूर: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या नाराज समर्थकांची वरळी निवासस्थानी बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच भाजप नेते आशिष शेलार यांनी मोठं विधान केलं आहे. पंकजा मुंडे यांचं कोणतंही दबाव तंत्र नाही. त्या असं काही करणार नाहीत, असं आशिष शेलार यांनी सांगितलं. (ashish shelar reaction on pankaja munde call supporters meeting in mumbai)

आशिष शेलार पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज ते कोल्हापुरात होते. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या बातम्यांवर प्रतिक्रिया व्यक्त केली. कोणतंही दबाव तंत्र नाही. पंकजा मुंडे कधी असं करत नाहीत, करणार नाहीत. कधी कधी कार्यकर्त्यांच्या भावनाचा आक्रोश होतो. तो काही पक्ष द्रोह असल्याचं मानण्याचं कारण नाही, असं शेलार यांनी स्पष्ट केलं. तसेच पंकजा मुंडे यांनी त्यांच्या नाराजीच्या बातम्यांवर उत्तर दिलं आहे. त्यामुळे अधिक बोलण्याची गरज नाही, असंही त्यांनी सांगितलं.

हवामानाप्रमाणे नानांची विधाने बदलतात

यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही टीका केली. नाना पटोले आपल्या विधानावर ठाम राहत नाहीत. ते नेहमीच विधान बदलतात. आधी फोन टॅपिंगबद्दल बोलले. भरसभागृहात त्यांनी हे सांगितलं. त्यानंतर मुंबईवरून ते लोणावळ्यात आले आणि हवामान बदलल्याप्रमाणे त्यांचं वक्तव्य बदललं. तिकडे त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली. आता विदर्भात गेले आहेत वाटतं. पुन्हा हवामान बदललं तर पुन्हा केंद्र सरकारकडे बोट दाखवतील. जो माणूस स्वत: च्या विधानावर टिकू शकत नाही. त्याची केस काय टिकणार?, असा सवाल करतानाच शरद पवारांनी त्यांच्याबद्दल विधान केलं आहे. ते खरंच आहे. त्यामुळे त्यांची विधाने गांभीर्याने घ्यायची गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला.

कर नाही त्याला डर कशाला?

यावेळी त्यांनी ईडीच्या चौकश्यांवरूनही प्रतिक्रिया व्यक्त केली. इन्कम टॅक्स आणि ईडी कुणाच्या मागे लागली नाही. गुन्हेगारांच्या मागे लागली आहे. त्यामुळे कर नाही त्याला डर कशाला हवा, असा सवाल त्यांनी केला.

पंढरपूर दाखवूच

यावेळी त्यांनी शिवसेनेच्या शिवसंपर्क मोहिमेवरही टीका केली. शिवसंपर्क मोहीम हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही कितीही संपर्क अभियान करा, पक्ष विस्तार करा, स्वबळावर लढा, काहीही करा. पण येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला पंढरपूर दाखवूच, असंही ते म्हणाले. (ashish shelar reaction on pankaja munde call supporters meeting in mumbai)

संबंधित बातम्या:

पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेतील असं वाटत नाही; वाचा, भाजप नेते राम शिंदे आणखी काय म्हणाले?

नाराज समर्थकांसोबत महत्त्वाची बैठक, पंकजा मुंडे काय निर्णय घेणार?; वाचा सविस्तर

शिवसेनेचे दोन बडे नेते काँग्रेसमध्ये, अशोक शिंदेंसह बाळ्या मामा म्हात्रेंचेही पक्षांतर

(ashish shelar reaction on pankaja munde call supporters meeting in mumbai)

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.