‘सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही’, अशोक चव्हाणांकडून नाराजी व्यक्त

"ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही", अशी नाराजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे (Ashok Chavan nervous on Thackeray government).

'सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही', अशोक चव्हाणांकडून नाराजी व्यक्त
Follow us
| Updated on: Jun 14, 2020 | 5:02 PM

मुंबई : “ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही”, अशी नाराजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे (Ashok Chavan nervous on Thackeray government). “तीनही पक्षांना समान अधिकार हवेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार”, असंदेखील अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीतील धुसफूस काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही. काँग्रेस नेते सोमवारी म्हणजे उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, त्याआधी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत अशोक चव्हाण यांनी सरकारमध्ये काँग्रेसला दिल्या जाणाऱ्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे (Ashok Chavan nervous on Thackeray government).

दरम्यान, काँग्रेसच्या मंत्र्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला जात नाही, निर्णय प्रक्रियेत घेत नाही, यावरुन काँग्रेसमध्ये नाराजी आहे. बाळासाहेब थोरात यांनी याधीही भावना व्यक्त केल्या होत्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीदेखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यापाठोपाठ आता अशोक चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेतलं जात नसल्याने काँग्रेस नाराज आहे. याच पार्श्वभूमीवर 11 जून रोजी मंत्री सुनील केदार यांच्या बंगल्यावर काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मंत्री वर्षा गायकवाड, सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्र्यासोबत सोमवारी होणाऱ्या बैठकीबाबत बाळासाहेब थोरात यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत माहिती दिली होती. “मी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. सोमवारी आम्ही उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ. पक्षांमध्ये मतभेद असतात आणि प्रत्येकाला तसा अधिकारही आहे. मात्र मुख्यमंत्र्यांशी बोलून या सर्व गोष्टी आम्ही सोडवणार आहोत” असं बाळासाहेब थोरात यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी एक्स्क्लुझिव बातचीत करताना सांगितलं.

आमच्या मागण्या आहेत त्या महाराष्ट्राच्या हिताच्या आहेत, आमच्या वैयक्तिक मागण्या नाहीत, त्याबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, असंदेखील बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं होतं.

संबंधित बातम्या :

Balasaheb Thorat | तीन भावंडांमध्ये मतभेद असतात, आमचं तर तीन पक्षाचं सरकार : बाळासाहेब थोरात

निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्याने काँग्रेस नाराज, स्वतंत्र बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

बाळासाहेब थोरांताना विश्वासात घेऊनच काम सुरु, काँग्रेसकडे दुर्लक्ष नाही : राजेश टोपे

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.