सर्वात मोठी बातमी ! अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार, लोकसभेपूर्वीच काँग्रेसमध्ये सर्वात मोठा भूकंप?; कुणी केला दावा?

काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वीच ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, तसा दावाच शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.

सर्वात मोठी बातमी ! अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार, लोकसभेपूर्वीच काँग्रेसमध्ये सर्वात मोठा भूकंप?; कुणी केला दावा?
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 11:58 AM

संभाजीनगर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यानुसार येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तशा हालचाली सुरू आहेत, असं मोठं विधान शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केलं आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठं खिंडार बसणार असल्याचं स्पष्ट होत आहे. संजय शिरसाट यांनी आतापर्यंत ज्या ज्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. ते खरंच झालं आहे. त्यामुळे त्यांच्या या दाव्याकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे.

संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. काँग्रेसमध्ये एक वाक्यता नाही. अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांचं जमत नाही. बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांचं जमत नाही. हे तुम्ही पाहत आहात. मला तरी असं वाटतंय की अनेक दिवसांच्या ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यानुसार अशोक चव्हाण हे लोकसभेपूर्वी भाजपमध्ये जातील असं माझं मत आहे. एवढा मोठा नेता त्यांना काँग्रेसमध्ये वागणूक बरोबर मिळत नाही. ते निश्चितच भाजपमध्ये जातील, असं संजय शिरसाट म्हणाले. प्रयत्न तसेच चालू आहेत. अनेक घडामोडी तशा सुरू आहेत. बाळासाहेब थोरात भाजपमध्ये जाणार नाहीत. कारण विखे आणि थोरात यांचं विळ्या भोपळ्याचं नातं आहे. विखे पाटील जर काँग्रेसमध्ये गेले तर थोरात भाजपमध्ये जातील. असं त्यांचं उलटंपालटं गणित आहे. पण अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाण्याची मानसिकता तयार केली आहे, असा दावाही शिरसाट यांनी केला.

हे सुद्धा वाचा

सुप्रीम कोर्टात जा… राष्ट्रपतींकडे जा

सुषमा अंधारे या शिरसाट यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. सुषमा अंधारे हा विषय माझ्यासाठी संपला आहे. ती बाई प्रसिद्धीसाठी सर्व काही करत आहे. त्यांना अब्रूनुकसानीचा दावा करायचा आहे, सुप्रीम कोर्टात जायचंय, राष्ट्रपतींकडे जायचंय हा त्यांचा प्रश्न आहे. मला त्यावर उत्तरच द्यायचं नाहीये, असं शिरसाट म्हणाले. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. मी आधीच सांगितलं की, तुम्ही महिला आयोगाकडे जा. पोलिसात जा. चौकशी झाली पाहिजे हे माझं मत आहे. एकदा यांना उघडं पडू दे. जे काही व्हायचं ते होईल, असं ते म्हणाले.

वज्रमूठ कुठे होती?

महाविकास आघाडीच्या कालच्या सभेवरही त्यांनी टीका केलीय. वज्रमूठ कुठे होती? ही वज्रमूठ नव्हती. राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले जे बाजूला बसले होते, ते केवळ उद्धव ठाकरे यांची मजा घेण्यासाठी बसले होते. हे लोक कधीच एकत्र येणार नाहीत. काल नाना पटोले या सभेला गेले नाहीत, एवढी आजारी होते की त्या सभेला आले नाही. आज सूरतच्या कोर्टात चालले आहेत. यावरून काय ते समजून जा, असं सूचक विधान त्यांनी केलं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.