VIDEO: तुमचे मुखवटे उतरवल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही; राऊतांचा इशारा
आर्यन खानचा ड्रग्स प्रकरणात काहीच संबंध नसल्याचं उघड आलं आहे. या प्रकरणाचं सत्यबाहेर आलं आहे. या प्रकरणात बनाव केला गेला होता. तपास यंत्रणांचा दुरुपयोग नव्हता तर काय होतं? असं सांगतनाच आर्यन प्रकरणात जसा बनाव केला तसाच बनाव आमच्या प्रकरणात केला गेला आहे.
ठाणे: आर्यन खानचा (aryan khan) ड्रग्स प्रकरणात काहीच संबंध नसल्याचं उघड आलं आहे. या प्रकरणाचं सत्यबाहेर आलं आहे. या प्रकरणात बनाव केला गेला होता. तपास यंत्रणांचा दुरुपयोग नव्हता तर काय होतं? असं सांगतनाच आर्यन प्रकरणात जसा बनाव केला तसाच बनाव आमच्या प्रकरणात केला गेला आहे. आतापर्यंत मी यात पडलो नव्हतो. आता मी समोर आलो आहे. आता तुमच्या प्रत्येकाचे मुखवटे उतरवल्याशिवाय मी राहणार नाही. तुम्हाला जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. माझे शब्द लिहून ठेवा. आय रिपीट मेक माय वर्ड, असा इशाराच शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी दिला आहे. तसेच बाप-बेटे तुरुंगात जाणारच आहेत. तुम्ही घोटाळा केला नाही तर मग अटकपूर्व जामिनासाठी का धडपड करत आहात?, असा सवालच राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांना नाव न घेता केला. ते मीडियाशी बोलत होते.
आर्यन खान प्रकरणाचं सत्यबाहेर आलं आहे. तुम्ही किती मोठं अवडंबर तयार केलं होतं. शाहरुखचा मुलगा म्हणून, मोठं नाव म्हणून तुम्ही अवडंबर तयार केलं. बनाव केला. आमच्याबाबतीतही तेच केलं. आता मी आलोय. तुम्ही तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही पराजित होणार आहात, असं संजय राऊत म्हणाले.
मग अटकपूर्व जामिनासाठी का अर्ज करत आहात?
बाप-बेटे तुरुंगात जाणार आहेत. ते मी पहिल्यापासून बोलत आहे. पीएमसी घोटाळा आणि इतर भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेत. खंडणीची प्रकरणं आहेत. आतापर्यंत ते दाबलेले होते. हळूहळू बाहेर येत आहेत. बाप-बेटे अटकपूर्व जामिनासाठी का पळत आहेत? आतापर्यंत पळापळ होत नव्हती. जेव्हापासून मी भ्रष्टाचार बाहेर काढला तेव्हापासून बाप-बेटे दारोदार फिरत आहेत. अटकपूर्व जामिनासाठी या कोर्टातून त्या कोर्टात जात आहेत. अटकपूर्व जामिनासाठी का अर्ज करत आहात? तुम्ही काहीच केलं नाही ना? मग एवढी धावपळ कशासाठी. हे बाप बेटे आणि काही लोक जे मोठमोठ्या गप्पा मारतात. आतापर्यंत इतरांना धमक्या देत होते. याला जेलमध्ये पाठवू त्याला पाठवू. मग तुम्ही जामिनासाठी अर्ज का करत आहात?, असा सवाल त्यांनी केला.
अधिवेशन संपल्यावर अजून बोलेल
तुमच्यावर गुन्हा दाखल नाही. कोणत्या गुन्ह्यात अटक होणार हे तुम्हाला माहीत नाही. पीएमसी घोटाळ्यात अटक होणार का हे तुम्ही सांगा, असं सरकारी वकिलाने विचारलं आहे. मी वाचलं. तुम्ही एका नाही अनेक प्रकरणात जाणार आहात. अपहरण, दहशतवाद, वसुली आदी प्रकरणे आली आहेत. काही प्रकरणं पंतप्रधान कार्यालयाला दिली आहेत. काही ठेवली आहे. अधिवेशन संपल्यावर सांगेन, असं त्यांनी सांगितलं.
केंद्रात सरकार हा तुमचा भ्रम
तुम्ही पाहत राहा. मी म्हणालो ना साडेतीन तेही पाहा. त्या साडेतीन लोकांची नावे तुम्ही विचाराल. पण नाव दिलं तर ते अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करतील. त्यामुळे ते जसजसे ते आत जातील ते तुम्ही पाहात राहा, असं सांगतानाच काही अधिकाऱ्यांना वाटतं केंद्रात आमचं सरकार आहे. ते भ्रमात आहेत. महाराष्ट्र सरकारच्या तपास यंत्रणांनाही राज्यात झालेल्या भ्रष्टाचार, खंडणीवर तपास करून आरोपींना अटक करण्याचा अधिकार आहे. हे त्यांना सांगू इच्छितो. हे ऑन रेकॉर्ड सांगत आहे, असंही ते म्हणाले.
Mark my words… I repeat : “Bap Beta jail jayenge”. Period.
And rest assured, apart from Baap & Beta, 3 Central agency officials and their “Vasuli Agents” will also go behind bars.
Maharashtra Jhukega nahi ! pic.twitter.com/4SCyOY4Pna
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 2, 2022
संबंधित बातम्या:
ट्रकच्या टक्करने पिकअप व्हॅनचा चुराडा; नाशिकचे 3 तरुण गतप्राण, दोघे गंभीर