Bacchu Kadu : मंत्रिपदावर दावा आजच सोडणार होतो… मुख्यमंत्र्यांनी फार आग्रह केला; बच्चू कडू म्हणाले, आता पुढचा निर्णय…

त्यानंतर विरोधकांकडून आम्हाला अमिषं आली, आम्हीही मंत्रिपदं देऊ, आमच्यासोबत या असं विरोधक म्हणाले. पण आम्ही पाठिंब्यावर ठाम राहिलो. उद्धव ठाकरे शब्दावर ठाम राहिले.

Bacchu Kadu : मंत्रिपदावर दावा आजच सोडणार होतो... मुख्यमंत्र्यांनी फार आग्रह केला; बच्चू कडू म्हणाले, आता पुढचा निर्णय...
bacchu kaduImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 12:07 PM

अमरावती, दिनांक 13 जुलै 2023 : मी मंत्रिपदावर आजच दावा सोडणार होतो. पत्रकार परिषद घेऊन तसं जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. पण गेल्या अर्धा तासात मुख्यमंत्र्यांचे अनेक फोन आले. त्यांनी मला दावा न सोडण्याची विनंती केली. मला भेट. आपण चर्चा करू. त्यानंतर तू निर्णय घे, असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी फार आग्रह केल्यामुळे मी आज मंत्रिपद सोडण्याचा दावा मागे घेत आहे, असं सांगतानाच मी शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदही घेणार नाही, असं प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी सांगितलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मंत्रिपदाचा दावा सोडणार असा निर्णय घेणार होतो. पण मुख्यमंत्री सातत्याने फोन करत होते. अर्ध्या तासापासून त्यांचे फोन सुरू होते. आज मंत्रिपदाचा दावा सोडू नको. फक्त मला भेटून निर्णय घे. त्यांनी मला 17 ला भेटायला सांगितलं आहे. मला भेट आणि हवं तर 18 तारखेला निर्णय घे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे मी त्यांना 17 तारखेला त्यांना भेटणार आहे. चर्चा झाल्यावर मग 18 ला निर्णय घेणार आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री पेचात

इतनी शक्ती हमे देना दाता हे गाणं मी रात्री ऐकत होतो. त्यामुळे माझं मत परिवर्तन झालं आहे. आपण सामान्यांसाठी राहिलं पाहिजे. काही चुका आमच्या हातून झाल्या असेल तर त्या दुरुस्त केल्या पाहिजे. त्याची काळजी घेतली पाहिजे. मला दिव्यांगासाठी वेळ द्यायचा आहे. मंत्रिपद घेतल्यावर मला काम करता येणार नाही. पद माझ्यासाठी क्षुल्लक आहे. मला पदाची लालसा नाही. मुख्यमंत्री पेचात आहेत. कुणाकुणाला पद देणार? त्यामुळे मी मंत्रिपदावरचा दावा सोडला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

राजकारणाचा कंटाळा आलाय

एकंदरीत सत्ता, पैसा आणि पुन्हा सत्ता हे बदलतं राजकारण आहे. त्याचा कंटाळा आलाय. लोक विचित्रपणे प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हे थांबलं पाहिजे. सर्व काही पदासाठी नसते. लोक म्हणतात, आता तुम्हाला पद मिळणार नाही. 50 खोके घेतले, असं म्हणतात. काही प्रामाणिकपणे प्रतिक्रिया देतात तर काही पैसे घेऊन कमेंट करत आहे, असंही ते म्हणाले.

आपलं सरकार बनतंय, आम्हाला पाठिंबा द्या

एकनाथ शिंदे हे मला महाविकास आघाडीचं सरकार येण्यापूर्वी उद्धव ठाकरेंकडे घेऊन गेले होते. उद्धव ठाकरेंनी पाठिंबा द्या म्हणून सांगितलं होतं. आपलं सरकार बनतंय, आम्हाला पाठिंबा द्या, असं उद्धव ठाकरेंनी स्वत: फोन करून म्हटलं होतं. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे गेलो. शिंदे सोबत होते. आम्ही पाठिंबा दिला. त्यानंतर विरोधकांकडून आम्हाला अमिषं आली, आम्हीही मंत्रिपदं देऊ, आमच्यासोबत या असं विरोधक म्हणाले. पण आम्ही पाठिंब्यावर ठाम राहिलो. उद्धव ठाकरे शब्दावर ठाम राहिले. त्यांनी राज्यमंत्रिपद दिलं.

शिंदेंचा गुलाम बनेल

दिव्यांग मंत्रिपद तयार करावी अशी मागणी मी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. पण ते खातं तयार झालं नाही. ते झालं असतं तर गुवाहाटिला जायची वेळ आली नसती. शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांनी दिव्यांग मंत्रीपद तयार केलं. माझ्या बंडामुळे आणि आंदोलानामुळे हे खातं तयार झालं. मी शिंदेंचा जन्मभर आभारी राहील. त्यांचा व्यक्तिगत गुलामही बनेल. त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे, असंही ते म्हणाले.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.