मैदान गाजवणारा बांगलादेशी क्रिकेटर मुशरफी मुर्तझा निवडणुकीत जिंकला की हरला?
ढाका : बांगलादेशच्या वनडे क्रिकेट टीमचा कर्णधार मुशरफी बिन मुर्तझा याने बांगलादेशातील निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला असून, तो खासदार म्हणून निवडून आला आहे. आवामी लीगच्या तिकिटावर मुर्तझा निवडणुकीत उतरला होता. प्रतिस्पर्धी उमेदवाराला मुर्तझाने 2 लाख 66 हजार मतांच्या फरकाने पराभूत केले. मूर्तझाला एकूण 2 लाख 74 हजार 418 मतं मिळाली. दुसऱ्या क्रमांकावरील जातिया औकया या […]
ढाका : बांगलादेशच्या वनडे क्रिकेट टीमचा कर्णधार मुशरफी बिन मुर्तझा याने बांगलादेशातील निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला असून, तो खासदार म्हणून निवडून आला आहे. आवामी लीगच्या तिकिटावर मुर्तझा निवडणुकीत उतरला होता. प्रतिस्पर्धी उमेदवाराला मुर्तझाने 2 लाख 66 हजार मतांच्या फरकाने पराभूत केले. मूर्तझाला एकूण 2 लाख 74 हजार 418 मतं मिळाली. दुसऱ्या क्रमांकावरील जातिया औकया या उमेदवाराला केवळ 8 हजार 6 मतं मिळाली. म्हणजेच, मुशरफी मुर्तझा ज्या जागेवरुन निवडणूक लढवली, त्या जागेवरील एकूण मतांपैकी 96 मत एकट्या मुर्तझाला मिळाली.
क्रिकेट कर्णधार ते खासदार असा प्रवास असलेला मुशरफी मुर्तझा हा बांगलादेशातील दुसरा खेळाडू आहे. याआधी माजी कर्णधार नैमुर रहमान दुर्जोय हे सुद्धा खासदार बनले होते. मात्र, क्रिकेटमध्ये सक्रीय असतानाच खासदार बनणारा मुर्तझा हा पहिला क्रिकेटर आहे.
कुठल्याही वन डे सीरीजवर निवडणुकीच्या प्रचाराचा प्रभाव पडणार नाही, असे याआधीच मुर्तझाने स्पष्ट केले होते. क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत असतानाच, मुर्तझाने निवडणुकीच्या रिंगणातही दणदणीत कामगिरी केली आहे. देशासाठी क्रिकेट खेळत असताना, मुर्ताझाला आता देशासाठी समाजसेवाही करता येणार आहे. “वर्ल्डकप सात-आठ महिन्यांवर असून, वर्ल्डकप खेळणे माझं स्वप्न आहे. त्यानंतर मी काय करेन मला माहित नाही. मात्र, त्याआधीच जनतेने खासदार बनवून मला त्यांच्या सेवेची जबाबदारी दिलीय”, असेही मुर्तझाने माध्यमांशी बोलताना सांगितले.
बांगलादेशात पुन्हा शेख हसिना
बांगलादेशच्या निवडणुकीत विद्यमान पंतप्रधान शेख हसिना यांनीच पुन्हा एकदा बाजी मारली आहे. 30 डिसेंबर रोजी मतदान झालं आणि रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरु होती. बांगलादेशातील 300 पैकी जवळपास 266 जागांवर सत्ताधारी अवामी लीग आणि त्यांचे मित्रपक्ष विजयी झाले आहेत. विरोधी पक्षांना केवळ 20-21 जाग मिळाल्या आहेत, असे बांगलादेशातील माध्यमांनी म्हटले आहे. शेख हसिना या चौथ्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान होतील.