नवाब मलिकांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा बॅनर “कुछ ही देर की खामोशी है फिर शोर आएगा तुम्हारा तो सिर्फ वक्त है हमारा दौर आएगा”

नवाब मलिकांना अटक झाल्यानंतर आता नंबर कोणाचा अशी चर्चा भाजपाच्या गोठात आहे, परंतु महाविकास आघाडीतील अनेकांनी घोटाळे केले असल्याने मी किमान 25 तरी घोटाळे बाहेर काढणार असं किरीट सोमय्यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

नवाब मलिकांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा बॅनर कुछ ही देर की खामोशी है फिर शोर आएगा तुम्हारा तो सिर्फ वक्त है हमारा दौर आएगा
नवाब मलिक यांच्या घरासमोरचा बॅनर
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 11:57 AM

मुंबई – नवाब मलिक (nawab malik) यांना ईडीने (ED) ताब्यात घेतल्यापासून त्याची चौकशी सुरू असल्याने त्यांनी ईडीच्या कस्टडीमध्ये ठेवण्यात आले आहे. भाजपा (BJP) चुकीच्या पध्दतीने महाविकास आघाडीतील नेत्यांना टार्गेट करीत असल्याचे महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे, तर नवाब मलिक यांनी चुकीच्या पध्दतीने जमीन खरेदी केली असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या गुन्ह्याची त्यांना शिक्षा मिळेल. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यामुळे जोरदार जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राज्यभर नवाब मलिकांचा यांचा राजीनामा घ्यावा म्हणून आंदोलन देखील केलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ बॅनर लावले असून त्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.

नवाब मलिक यांच्या घरासमोर बॅनर

मलिकांना अटक केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल मंत्रालय परिसरात धरणं आंदोलन केलं. त्यावेळी तिथं तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित होते. आंदोलनादरम्यान भाजपाच्या विरोधात बोलणा-या प्रत्येक पक्षाला देशात असं टार्गेट केलं जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे. राष्ट्रीय यंत्रणा चुकीच्या ठिकाणी वापर होत असून ही संविधानाची पायमल्ली होत असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. आज नवाब मलिक यांच्या घरांच्या समोर काही कार्यकर्त्यांनी “कुछ ही देर की खामोशी है फिर शोर आएगा तुम्हारा तो सिर्फ वक्त है हमारा दौर आएगा” आणि सब सवालों का एक ही जवाब, हमारे नवाब असे आशल लिहिलेले बॅनर लावण्यात आले आहेत त्यामुळे तिथल्या कार्यकर्त्यांनी भाजपाला बॅनरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

किरीट सोमय्यांच्या रडारवर आता कोण ?

नवाब मलिकांना अटक झाल्यानंतर आता नंबर कोणाचा अशी चर्चा भाजपाच्या गोठात आहे, परंतु महाविकास आघाडीतील अनेकांनी घोटाळे केले असल्याने मी किमान 25 तरी घोटाळे बाहेर काढणार असं किरीट सोमय्यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. तसेच शिवसेनेचे अनेक नेते किरीट सोमय्यांच्या रडारवर आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे, संजय राऊतांना पुढे लावू नये. 19 बंगल्यांचा हिशोब किरीट सोमय्यांना द्यावाचं लागणार असंही किरीट सोमय्या झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

Yashwant Jadhav: कोण आहेत शिवसेनेचे यशवंत जाधव, जे आयटीच्या रडारवर आलेले आहेत?

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धावरच्या भारतीय भूमिकेवर अमेरिका नाराज, बायडेन यांना काय हवे?

उपमहापौरासह भाजपचे 4 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला; नाशिकमध्ये फोडाफोडीला वेग!

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.