AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विरोधकांकडे लक्ष देऊ नका, पालिका निवडणुकीसाठी कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

विरोधक काय बोलतात त्याकडे लक्ष देऊ नका. त्यांचा समाचार घेण्यास आम्ही सक्षम आहोत. तुम्ही महापालिकेच्या कामाला लागा. जय्यत तयारी करा, असे आदेशच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना आमदार आणि पदाधिकाऱ्यांना दिले. (Be Ready for bmc election, uddhav thackeray order to shivsainik)

विरोधकांकडे लक्ष देऊ नका, पालिका निवडणुकीसाठी कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश
| Updated on: Nov 20, 2020 | 8:31 PM
Share

मुंबई: विरोधक काय बोलतात त्याकडे लक्ष देऊ नका. त्यांचा समाचार घेण्यास आम्ही सक्षम आहोत. तुम्ही महापालिकेच्या कामाला लागा. जय्यत तयारी करा, असे आदेशच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना आमदार आणि पदाधिकाऱ्यांना दिले. (Be Ready for bmc election, uddhav thackeray order to shivsainik)

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने रणशिंग फुंकले आहे. तसेच मनसेसोबत युती करण्याचे संकेतही भाजपने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी आज शिवसेना आमदार आणि पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी पदाधिकारी आणि आमदारांचं म्हणणं ऐकून घेतलं. तसेच प्रत्येकाच्या मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शिवसैनिकांनी कोरोना संकटात केलेल्या कामाचं कौतुक करून आमदार आणि पदाधिकाऱ्यांचं मनोधैर्य वाढवलं. या वर्षात कोरोनाच्या संकटामुळे जनतेच्या विकासाचं काम करता आलं नाही. पण आता कोणतंही संकट येवो. काम करायचं. स्वत:ची काळजी घेऊन जनतेची कामं करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं शिवसेनेचे चेंबूरमधील आमदार प्रकाश फातर्पेकर यांनी सांगितलं.

मुंबई महापालिका निवडणूक आली आहे. त्यासाठी शिवसैनिकांनो सज्ज व्हा. आपल्या प्रत्येक शिवसैनिकाला आतापासूनच कामाला लावा. गेल्यावेळी आपण कुठे कमी पडलो ते पाहा आणि जोमाने कामाला लागा. विरोधक काय बोलतात त्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही निवडणुकीची तयारी करा. विरोधकांचा समाचार घेण्यास आम्ही सक्षम आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मुंबई आणि शिवसेनेचं अतूट नातं आहे. पण काही लोक आता पालिकेवरील शिवसेनेचा भगवा उतरविण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यासाठी शिवसेनेला अडचणीत आणण्याचे, शिवसेनेचा अपप्रचार करण्याचे प्रयत्नही सुरू झाले आहेत. त्यांचे हे मनसुबे उधळून लावण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेशही उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, भाजपने मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीचं बिगूल फुंकले आहे. भाजपने पालिका निवडणुकीची सर्व जबाबदारी पक्षाचा आक्रमक चेहरा असलेल्या आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे सोपवली आहे. पक्षाने जबाबदारी सोपवताच भातखळकरही कामाला लागले असून आज त्यांनी वीज माफीच्या मुद्द्यावर वांद्रे येथे मोठा मोर्चा काढला होता. त्यामुळे शिवसेनेनेही कंबर कसली असून पालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या:

LIVE | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेची मुंबई महापालिका निवडणुकीची खलबतं

“भगव्याचा रंग तुम्हीच फिका केला”, फडणवीसांनंतर आशिष शेलारांचाही शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबई सावरली, दिल्लीत कोरोनाचा कहर का झाला?; सर्व्हेतून आली पाच कारणे!

(Be Ready for bmc election, uddhav thackeray order to shivsainik)

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.