नाना पटोलेंनी राजीनामा दिला; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं?
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अखेर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. (before nana patole resign what happened in congress?)
मुंबई: काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अखेर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून पटोले यांचे नाव महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत होतं. त्यावर हायकमांडने आज अखेर शिक्कामोर्तब केल्यानंतर पटोले यांनी राजीनामा दिला. आता कोणत्याही क्षणी नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पटोले यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या नावाच्या चर्चेपासून ते त्यांच्या राजीनाम्यापर्यंत पडद्यामागे नेमकं काय घडलं? त्याचा घेतलेला हा आढावा. (before nana patole resign what happened in congress?)
सोनिया गांधींकडून हिरवा कंदील
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कालच पटोले यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्त केलं होतं. पटोले यांनी काल दिल्लीत सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी पटोले यांना विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आलं. तसेच पक्षवाढीसाठी या दोन्ही नेत्यांनी पटोले यांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे पटोले यांनी दुपारपर्यंत काही सोपस्कार पूर्ण करून विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.
झिरवळ तातडीने मुंबईत
नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचं निश्चित झाल्यानंतर विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांना तातडीने मुंबईत बोलावून घेण्यात आले. काल झिरवळ नाशिकच्या सुरगणामध्ये होते. राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ते नाशिकला आले होते. पण पटोले यांचा निरोप मिळताच त्यांनी मुंबईची वाट धरली.
एचके पाटील, थोरातांशी चर्चा
आज सकाळी पटोले यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली. यावेळी पटोले यांना त्यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी निश्चित असून त्यात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे तुम्ही राजीनामा देऊ शकता, असं सांगण्यात आलं. त्यामुळे पटोले यांनी राजीनामा पत्र टाइप करण्यास घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट
त्यानंतर दुपारी पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी पटोले खिशात राजीनामा घेऊन आले होते. आपण विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला निघालो असल्याचं पटोले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं. वर्षभरात त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभारही मानले आणि थेट झिरवळ यांच्या केबिनची वाट धरली.
मंत्रिपदासाठी घोडं अडलं?
नाना पटोले यांची 15 दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्षपदासाठी निवड झाली होती. सोनिया गांधी यांनी त्यांच्या निवडीच्या फाईलवर सहीही केली होती. पण ऐनवेळी पटोले मंत्रिपदावर अडून बसले. प्रदेशाध्यक्षपदाबरोबर मंत्रिपदही आपल्याकडे असावं असं त्यांनी हायकमांड यांच्यापुढे अट घातली. त्यामुळे सोनिया गांधी नाराज झाल्या. त्यामुळे पटोले यांची नियुक्ती रखडली. पटोले यांच्या ऐवजी दुसरा प्रदेशाध्यक्ष शोधण्यासही सुरुवात झाली. पण कुणीही ही जबाबदारी घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे अखेर पुन्हा पटोले यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळे पटोले यांची मंत्रिपदाची अटही हायकमांडला मान्य करावी लागल्याचं सूत्रांनी सांगितलं. (before nana patole resign what happened in congress?)
असा निघाला तोडगा
नाना पटोले यांनी मंत्रिपदाची मागणी केल्यानंतर त्यांना कोणतं मंत्रिपद द्यायचं? हा काँग्रेससमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. पटोलेंना मंत्रिपद द्यायचे तर काँग्रेसच्या एखाद्या मंत्र्याचा बळी द्यावा लागणार होता. मात्र, राजीनामा देणारा मंत्री नाराज होऊ शकत असल्याने त्याची नाराजी ओढवून घेणंही परवडणारं नव्हतं. त्यामुळे अखेर शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद द्यायचं त्याबदल्यात आणखी एक उपमुख्यमंत्रीपद घ्यायचं असा तोडगा काढण्यात आला. शिवसेनेसह राष्ट्रवादीनेही या नव्या पर्यायाला पाठिंबा दिला. त्यामुळे हा तिढा सुटला. मात्र, आता काँग्रेस उपमुख्यमंत्रीपद कुणाला देणार? आणि पटोले यांच्या वाट्याला कोणतं मंत्रिपद येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (before nana patole resign what happened in congress?)
संबंधित बातम्या:
नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांचे सूचक वक्तव्य
BREAKING | नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा
विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, आता पुढे काय?
(before nana patole resign what happened in congress?)