AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मी मंत्री झालो, मुंडे साहेब माझे नेते” पंकजांच्या भेटीनंतर भागवत कराडांना गोपीनाथ मुंडेंची आठवण, ट्विटची जोरदार चर्चा

केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी दिल्लीत पंकजा मुंडे यांची भेट घेतल्याचं ट्विट केलंय. पंकजा मुंडे यांची भेट घेतली, मन मोकळं केलं, असं म्हणत त्यांनी या दिल्लीतील भेटीची माहिती दिलीय.

मी मंत्री झालो, मुंडे साहेब माझे नेते पंकजांच्या भेटीनंतर भागवत कराडांना गोपीनाथ मुंडेंची आठवण, ट्विटची जोरदार चर्चा
bhagwat karad
| Edited By: | Updated on: Jul 12, 2021 | 11:28 PM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यानं मुंडे समर्थकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. त्यामुळे राजीनामा सत्रही सुरू झालंय. त्यातच पंकजा मुंडे दिल्लीत गेल्यानं चर्चांना उधाण आलंय. आता केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी दिल्लीत पंकजा मुंडे यांची भेट घेतल्याचं ट्विट केलंय. पंकजा मुंडे यांची भेट घेतली, मन मोकळं केलं, असं म्हणत त्यांनी या दिल्लीतील भेटीची माहिती दिलीय. यानंतर पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलंय.

भागवत कराड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “आज (12 जुलै) पंकजा मुंडे दिल्लीमध्ये बैठकीसाठी आल्या. त्यांची भेट घेतली. मन मोकळे झाले. मुंडे साहेबांची आठवण आवर्जून झाली. मी मंत्री झालो, मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज ताई आहेत. त्यांनीही साहेबांच्या प्रमाणे शुभेच्छा दिल्या.”

राजीनामा सत्र सुरूच; 77 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन मस्के मुंबईकडे रवाना

भाजप नेत्या पंकजा मुंडे समर्थकांचं राजीनामा सत्र अद्यापही थांबलेले नाही. पंकजा समर्थक आणि बीडचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे 77 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन थेट मुंबईला रवाना झाले आहेत. उद्या मंगळवारी ते पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे उद्या पंकजा मुंडे यांनी समर्थकांच्या बोलावलेल्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डावलण्यात आल्यानं बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरूच आहे. जिल्ह्यात भाजप पदाधिकाऱ्यांत प्रचंड नाराजीचे सूर असून आणखीन राजीनामे येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा आशयाचं पत्र भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लिहिलं आहे. 77 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन जिल्हाध्यक्ष मस्के हे मुंबईकडे रवाना झाले आहेत.

उद्या भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन यावर चर्चा करणार आहेत. या राजीनामा सत्रावर भाजप प्रदेश कार्यकारिणी काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पदांचा राजीनामा देणाऱ्यांमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या जयश्री मस्के यांचाही समावेश आहे. त्यामुळे राजेंद्र मस्के यांच्याही निर्णयाकडे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा :

पंकजा मुंडेंचा दिल्ली दौरा पक्ष बैठकीसाठी की नाराजी कानावर घालण्यासाठी? वाचा 5 मोठे मुद्दे

अब राजा का बेटाही राजा नही बनेगा, पाच वर्षात स्टेज सांभाळणारा मंत्री झाला, मंत्री असलेले घरी गेले, तो Videoव्हायरल

“पंकजाताई, ओबीसी जनगणनेच्या मागणीमुळे मंत्रिपद दिलं नसावं, आता समाजासाठी निर्णय घ्या”

व्हिडीओ पाहा :

Bhagwat Karad tweet about meeting with Pankaja Munde in Delhi

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.