Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना हाताशी धरुन सरकार पाडलं जातंय? संजय राऊत म्हणतात, हा घाव छातीवर नाही तर पाठीवर
एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातमधील एका हाॅस्टेलमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदेसोबत शिवसेनेचे 29 आमदार देखील आहेत. शिवसेने नेते संजय राऊत बोलताना म्हणाले की, आज सकाळपासून अनेकांशी संपर्क झाला आहे. एकनाथ शिंदे मुंबईच्या बाहेर आहेत. मात्र, आताच त्यांच्याशीही संपर्क झाला आहे. जसे चित्र निर्माण केलं आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्याचे राजकारक चांगलेच तापले आहे. काल रात्रीपासूनच राज्यात विविध घडामोडी घडताना दिसतायेत. शिवसेनेनी रात्री उशीरा सर्व आमदारांची बैठक घेतली होती. तसेच आज शरद पवार देखील तातडीची बैठक घेणार असल्याचे कळते आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रतिक्रिया दिलीये. राऊत म्हणाले की, हा घाव छातीवर नाही तर पाठीवर आहे. राऊतांच्या बोलण्यातून खदखद स्पष्ट दिसत होती. एकनाथ शिंदे काल रात्रीपासून नॉट रिचेबल आहेत. शिवसेनेकडून (ShivSena) त्यांना सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातोय.
शिंदेसोबत शिवसेनेचे 29 आमदार
एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातमधील एका हाॅस्टेलमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदेसोबत शिवसेनेचे 29 आमदार देखील आहेत. शिवसेना नेते संजय राऊत बोलताना म्हणाले की, आज सकाळपासून अनेकांशी संपर्क झाला आहे. एकनाथ शिंदे मुंबईच्या बाहेर आहेत. मात्र, आताच त्यांच्याशीही संपर्क झाला आहे. काही गोष्टी संशयास्पद आहेत. सर्वांची बैठक आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांपासून सर्व आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. पुढे राऊत म्हणाले की, हा घाव छातीवर नाही तर पाठीवर आहे. शिवसेनेवर घाव करून दुबळी करण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच हा घाव फक्त शिवसेनेवर नसून महाराष्ट्रवर केला जातोय.
शिवसेनेचे संपर्कात नसलेले आमदार
1. एकनाथ शिंदे 2. शंभूराज देसाई 3. अब्दुल सत्तार 4. संदीपान भुमरे 5. भरत गोगावले 6. महेंद्र दळवी 7. संजय शिरसाठ 8. विश्वनाथ भोईर 9. बालाजी केणीकर 10. किमा दाबा पाटील 11. तानाजी सावंत 12. महेश शिंदे 13. थोरवे 14. शहाजी पाटील 15. प्रकाश आबिटकर 16. अनिल बाबर 17. किशोर अप्पा पाटील 18. संजय रायमुलकर 19. संजय गायकवाड 20. शांताराम मोरे 21. लता सोनवणे 22. श्रीनिवास वणगा 23. प्रकाश सुर्वे 24. ज्ञानेश्वर चौगुले 25. प्रताप सरनाईक 26. यामिनी जाधव हे अद्यापही संपर्कात नाहीयेत.