Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटना देशासाठी चिंताजनक, शरद पवारांकडून संवेदना प्रकट; पवारांनी सांगितला थरारक अनुभव

'देशाचे तिन्ही दलाचे प्रमुख किंवा संरक्षणमंत्री असोत. ते ज्या वाहनातून प्रवास करतात. त्यांची वाहणं अतिशय उत्तम दर्जाची असतात. कुठल्याची संकटाचा सामना करण्यास त्यांचं हेलिकॉप्टर सज्ज असतं. हे हेलिकॉप्टर अतिशय उत्तम दर्जाचं आणि सुरक्षित आहे. त्यामुळे अशाप्रकारचा अपघात या हेलिकॉप्टरचा होणं ही अतिशय धक्कादायक आणि चिंताजनक आहे'.

तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटना देशासाठी चिंताजनक, शरद पवारांकडून संवेदना प्रकट; पवारांनी सांगितला थरारक अनुभव
शरद पवारांकडून हेलिकॉप्टर अपघाताबाबत चिंता व्यक्त
Follow us
| Updated on: Dec 08, 2021 | 7:27 PM

मुंबई : तामिळनाडूमध्ये संरक्षण दलाच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात (Helicopter Accident) एकूण 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. तर सीडीएस जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) हे गंभीर जखमी असल्याची माहिती मिळतेय. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि संरक्षणमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळलेले शरद पवार (Sharad Pawar) यांनी दुर्घटनेबाबत चिंता व्यक्त केलीय. ही दुर्घटना अतिशय चिंताजनक आणि दु:खदायक आहे. मृत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांसमेवत माझ्या संवेदना आहेत, असं शरद पवार म्हणाले. तसंच पवार यांनी हेलिकॉप्टर प्रवासाचा एक थरारक अनुभवही सांगितला.

शरद पवार म्हणाले की, ‘देशाचे तिन्ही दलाचे प्रमुख किंवा संरक्षणमंत्री असोत. ते ज्या वाहनातून प्रवास करतात. त्यांची वाहणं अतिशय उत्तम दर्जाची असतात. कुठल्याची संकटाचा सामना करण्यास त्यांचं हेलिकॉप्टर सज्ज असतं. हे हेलिकॉप्टर अतिशय उत्तम दर्जाचं आणि सुरक्षित आहे. त्यामुळे अशाप्रकारचा अपघात या हेलिकॉप्टरचा होणं ही अतिशय धक्कादायक आणि चिंताजनक आहे’.

पवारांनी सांगितला हेलिकॉप्टर प्रवासाचा भीतीदायक अनुभव

‘माझा एक व्यक्तिगत अनुभव आहे. एक दिवस मी पुण्याहून मुंबईला हेलिकॉप्टरने निघालो होतो. त्यावेळी माझी पत्नी आणि एक राज्यमंत्री माझ्यासोबत होते. तेव्हा लोणावळा संपून खोपोलीकडे जाताना एक व्हॅली आहे. तिथे अनेकदा ढग असतात. आमचं हेलिकॉप्टर तिथून जात असताना ढगात आम्ही सापडलो, खूप वारा होता त्यामुळे ते हेलिकॉप्टर पुढे ज्यायला मर्यादा आल्या. ढगात सापडल्यामुळे आजुबाजूचं काही दिसत नव्हतं. आम्ही तिथे काळजी घेतली नसती तर ते हेलिकॉप्टर व्हॅलीमध्ये कुठेतरी आदळलं असतं. पण मला साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्राची माहिती असल्यामुळेमहाराष्ट्रात कळसूबाई हे सर्वात उंच शिखर नाही. ते 5 हजार फुटाच्या वर नाही. तेव्हा मी तातडीने पायलटला सांगितलं की आपण ७ हजार फूट उंचीवर गेलो तर काही अडथळा येणार नाही. ते हेलिकॉप्टर धडकण्याची शक्यता नाही. त्यामुळे ढगांचा अडथळा पार करुन सुखरुपपणे आम्ही उतरू शकलो’, असा अनुभवही पवार यांनी यावेळी सांगितला.

पवारांकडून मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना प्रकट

‘तामिळनाडूत जो काही प्रकार झाला त्याची खोलवर माहिती माझ्याकडे नाही. माझ्या माहितीप्रमाणे हेलिकॉप्टरचा अपघात झाला तो संपूर्ण परिसर जंगल आणि डोंगराचा आहे. त्यामुळे या ठिकाणी व्हिजिबिलीटीचा प्रश्न आला का? याची मला काही कल्पना नाही. पण या अपघातामुळं देशाचं मोठं नुकसान झालं आहे. सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला आणि दु:ख झाले. त्यांची कारकीर्द अतिशय उत्कृष्ट होती आणि गेल्या चार दशकांतील त्यांची संरक्षण क्षेत्रातील सेवा नेहमीच स्मरणात राहील. ही घटना देशाच्या दृष्टीने अतिशय दु:खदायक, चिंताजनक आणि काळजी करणारी आहे. अपघातातील मृत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत’, अशा शब्दात पवार यांनी दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.

इतर बातम्या :

Army helicopter crash : हेलिकॉप्टर अपघातात आतापर्यंत तब्बल 13 जणांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी

VIDEO: लष्कराचे हेलिकॉप्टरला कोसळताच भीषण आग, झाडेही कापली; पाहा व्हिडीओंमधून अपघाताची भीषणता

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.