भाजपचे 12 आमदार निलंबित, नागपुरात पडसाद, बावनकुळेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, पुतळे जाळले

भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ नागपुरात आज भाजपने आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्त्वात हे आंदोलन केलं गेलं.

भाजपचे 12 आमदार निलंबित, नागपुरात पडसाद, बावनकुळेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, पुतळे जाळले
भाजपचं चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात नागपुरात आंदोलन
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 10:46 AM

नागपूर : भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ नागपुरात आज भाजपने आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्त्वात हे आंदोलन केलं गेलं. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडी सरकारच्या नेते, मंत्र्यांचे पुतळे जाळण्यात आले. नागपुरातील बडकस चौकात हे आंदोलन झालं. (BJP Agitation Against Mahavikas Aaghadi Government Over BJP 12 MLA Suspended)

जोपर्यंत निलंबन मागे नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार

महाराष्ट्र सरकारने विधानमंडळाचा वापर करुन जुलूमशाही केली, हुकूमशाही केली आणि 12 आमदारांना निलंबित केलं. महाराष्ट्र सरकारने विधीमंडळाचा वापर राजकीय कामांसाठी केला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या मनात तीव्र रोष आहे. राज्यातील दीड हजार ठिकाणी कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. जोपर्यंत त्या 12 आमदारांचं निलंबन रद्द होत नाही तोपर्यंत राज्यात आंदोलन सुरु राहील. महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन ठराव घेतला आहे. विधान मंडळाचा वापर राजकारणाकरिता केलाय, अशी टीका भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

12 आमदार निलंबित

अधिवेशनाचा पहिला दिवस नि:संशय शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्या नावावर राहिला. कारण त्यांनी जे केलं किंवा काही कारणानं जे काही सभागृहात घडलं, त्यामुळे भाजपचे 12 आमदार वर्षभरासाठी निलंबित झाले. भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला आणि त्याचाच फायदा आघाडी सरकारनं घेतला.

सभागृहात नेमकं काय घडलं?

शिवसेना नेते भास्कर जाधव हे तालिका अध्यक्ष म्हणून विराजमान झाले आणि ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा चर्चेला आला. मोदी सरकारनं म्हणजेच केंद्रानं ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेला डाटा केंद्रानं द्यावा अशी मागणी करणारा ठराव मांडण्यासाठी भूजबळ उठले. त्याला विरोधी पक्षातल्या नेत्यांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली. त्याचं म्हणनं होतं की, या ठरावाची नोटीस नाही, हे असं करणं नियमात बसत नाही, फडणवीस विविध कामकाज नियमांचा हवाला देत आक्रमक झाले.

भास्कर जाधवांनी फडणवीस कसे चुकले हे सांगण्याचा प्रयत्न केला. फडणवीस जे काही मुद्दे मांडतायत त्याकडे दुर्लक्ष करुन जाधव भुजबळांना ठराव मांडायला सांगत होते. त्यावर विरोधी पक्ष आक्रमक होत होता. शेवटी त्याच गोंधळात भास्कर जाधवांनी तो ठराव मांडून घेतला, मताला टाकला. इकडे विरोधी पक्षाचा गदारोळ सुरु झाला. आम्हाला आमचे मुद्दे मांडू द्या म्हणून फडणवीस आक्रमक झाले. भास्कर जाधवांनी त्याच स्थिती मताला टाकलेला प्रस्ताव मंजूर झाल्याचं जाहीर केलं.

आता मात्र भाजप आमदार जास्तच आक्रमक झाले. गोंधळाची ठिणगी पडली ती इथेच…. भाजपाचे आमदार संजय कुटे, गिरीश महाजन हे अध्यक्षाच्या थेट व्यासपीठावर गेले. संजय कुटे तेवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी भास्कर जाधवांच्या समोरचा माईक खेचला. त्यावर जाधवांनी त्यांना इशारा केला. नंतर कुटेंनी तो माईक सोडला पण तोपर्यंत जो गोंधळ, वाद, गदारोळ व्हायचा तो होऊन गेला. सभागृह 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.

सभागृहातल्या गोंधळानंतर उपाध्यक्ष झिरवळ यांच्या कॅबिनमध्येही मोठा गोंधळ झाला. तिथं प्रत्यक्ष काय घडलं याचं फुटेज कुणाकडेच नाही. पण दारात भाजपच्या आमदारांनी केलेली गर्दी स्पष्टपणे दृश्यांमध्ये दिसते. पंधरा मिनिटं संपल्यानंतर पुन्हा भास्कर जाधव सभागृहात आले आणि झिरवळांच्या कॅबिनमध्ये त्यांना आई बहिणीवर भाजपच्या आमदारांनी शिविगाळ केल्याचा आरोप केला.

भास्कर जाधवांनी काय घडलं हे सांगितल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजपच्या बारा आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला. तो मंजूरही झाला. दुसरीकडे भास्कर जाधव यांनीच शिवीगाळ केल्याचा आरोप भाजपच्या निलंबित आमदारांनी केला.

(BJP Agitation Against Mahavikas Aaghadi Government Over BJP 12 MLA Suspended)

संबंधित बातम्या :

Breaking : विधानसभेत तुफान राडा; भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन, कोणकोणत्या आमदारांचा समावेश?

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.