Vidhan Parishad Election : विधान परिषदेला तर गुप्त मतदान होणार, मग फडणवीस आणखी वरचढ ठरणार? काँग्रेसच्या हंडोरेंचा संजय पवार होणार?

Vidhan Parishad Election : येत्या 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक आहे. भाजपने सदाभाऊ खोत यांच्यासह एकूण सहा उमेदवार या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मात्र, भाजपच्या संख्याबळानुसार त्यांचे फक्त चारच उमेदवार निवडून येऊ शकतात.

Vidhan Parishad Election : विधान परिषदेला तर गुप्त मतदान होणार, मग फडणवीस आणखी वरचढ ठरणार? काँग्रेसच्या हंडोरेंचा संजय पवार होणार?
विधान परिषदेला तर गुप्त मतदान होणार, मग फडणवीस आणखी वरचढ ठरणार?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 9:54 PM

मुंबई: राज्यसभा निवडणुकीचा (Rajyasabha Election) निकाल लागल्यानंतर आता भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीची (Vidhan Parishad Election) जोरदार तयारी सुरू केली आहे. जे राज्यसभेत घडलं त्याचीच पुनरावृत्ती विधान परिषदेत करण्यासाठी भाजप (bjp) सज्ज झाली आहे. राज्यसभा निवडणुकीत आघाडीची 9 मते फुटली होती. या निवडणुकीत अपक्षांचं मतदान गुप्त असतं. तर पक्षाचं मत पक्षाच्या पोलिंग एजंटला दाखवावं लागतं. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीत संपूर्ण मतदान गुप्त असतं. त्यामुळे राज्यसभेवेळी अपक्ष गळाला लागले, आता थेट आघाडीचेच आमदार गळाला लावून देवेंद्र फडणवीस बाजी मारणार का? अशी चर्चा रंगली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा संजय पवार करणार असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. तर, दुसरीकडे अपक्ष आमदार, छोट्या पक्षांचे आमदार आणि आपल्या पक्षाचे आमदार सांभाळण्याची वेळही आता महाविकास आघाडीवर आली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

येत्या 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक आहे. भाजपने सदाभाऊ खोत यांच्यासह एकूण सहा उमेदवार या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मात्र, भाजपच्या संख्याबळानुसार त्यांचे फक्त चारच उमेदवार निवडून येऊ शकतात. त्याशिवाय शिवसेनेने दोन, काँग्रेसने दोन आणि राष्ट्रवादीने तीन उमेदवार मैदानात उतरवले आहेत. इतर दोघांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. मात्र, अर्ज छाननीत त्यांचे अर्ज बाद झाले आहेत. म्हणजे सध्या विधान परिषदेच्या एकूण दहा जागांसाठी 13 उमेदवार मैदानात आहेत. उद्या 13 जून रोजी नाव मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

हे सुद्धा वाचा

गुप्तमतदान महागात पडणार

राज्यसभा निवडणुकीत खुले मतदान होते. पण विधान परिषद निवडणुकीत गुप्त मतदान होणार आहे. त्यामुळे पक्षाच्या उमेदवारानेही कुणाला मतदान केलं हे कळणार नाहीये. राज्यसभा निवडणुकीतील पराभवामुळे महाविकास आघाडीला जबरदस्त धक्का बसला आहे. त्यामुळे आघाडीने आता ताकही फुंकून पिण्यास सुरुवात केली आहे. आपली मते फुटू नयेत म्हणून आतापासूनच सावधगिरी बाळगली जात आहे.

कुणाकडे किती मते?

विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 27 मतांची गरज आहे. भाजपकडे 113 मते आहेत. त्यामुळे भाजपचे चारही उमेदवार सहज निवडून येणार आहेत. मात्र, भाजपने एक उमेदवार अतिरिक्त उतरवला आहे. तर अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे.

सेना, राष्ट्रवादीचा विजय सोपा

शिवसेनेकडे एकूण 55 मते आहेत. शिवसेनेने या निवडणुकीत दोन उमेदवार दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेचे दोन उमेदवार सहज विजयी होणार आहेत. आपले दोन उमेदवार विजयी झाल्यानंतरही शिवसेनेकडे एक- दोन अतिरिक्त मते उरतात. ही मते राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडे वळती केली जाणार आहेत. राष्ट्रवादीकडे 53 आमदार आहेत. नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुरुंगात आहेत. मात्र, सेनेची मते मिळाल्यावर राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार जिंकतील.

धोका कुणाला? हंडोरे की भाई जगताप?

विधानसभेत काँग्रेसकडे एकूण 44 आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेस एक जागा सहज जिंकणार आहे. परंतु काँग्रेसने दोन उमेदवार मैदानात उतरवले आहेत. त्यामुळे दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेसला दहा अतिरिक्त मतांची व्यवस्था करावी लागणार आहे. आघाडीकडे छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार मिळून 17 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे काँग्रसेच्या दुसऱ्या उमेदवाराचा विजयही सोपा असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, आकडेवारी आघाडीच्या बाजूने असली तरी राज्यसभेच्या निवडणुकीचा अनुभव पाहता आघाडीला गाफिल राहून चालणार नाही. दुसरीकडे काँग्रेस आपली पहिली 27 मते भाई जगताप यांच्या पारड्यात टाकणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हंडोरे यांना विजयासाठीच्या दहा मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. केवळ आघाडीच्या अपक्ष आणि छोट्या पक्षांनाच आपल्याकडे ठेवावे लागणार नसून बी प्लॅन म्हणून भाजपच्या समर्थक अपक्षांची मतेही खेचून आणण्याची कसरत करावी लागणार आहे. त्यात हंडोरे यशस्वी ठरतात का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.