भाजपची दुसरी यादी जाहीर, एकच उमेदवार घोषित
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2019) भाजपने काल (21 मार्च) पहिली उमेदवार यादी जाहीर केल्यांतर, त्यापाठोपाठ दुसरी यादीही जाहीर केली. पहिल्या यादीत भाजपने 182 उमेदवारांची घोषणा केली. मात्र, दुसऱ्या यादीचे वैशिष्ट्य असे की, त्यात फक्त एकाच उमेदवाराची घोषणा केली आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत दमण दीव या केंद्रशासित राज्यातील एकमेव उमेदवाराची घोषणा भाजपने […]
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2019) भाजपने काल (21 मार्च) पहिली उमेदवार यादी जाहीर केल्यांतर, त्यापाठोपाठ दुसरी यादीही जाहीर केली. पहिल्या यादीत भाजपने 182 उमेदवारांची घोषणा केली. मात्र, दुसऱ्या यादीचे वैशिष्ट्य असे की, त्यात फक्त एकाच उमेदवाराची घोषणा केली आहे.
भाजपच्या दुसऱ्या यादीत दमण दीव या केंद्रशासित राज्यातील एकमेव उमेदवाराची घोषणा भाजपने केली आहे. दमण दीवमधून भाजपकडून लालूभाई पटेल लढणार आहे. त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेसाठी भाजपने खास दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे. दमण दीव या केंद्रशासित राज्याची निवडणूक लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. म्हणजेच, 23 एप्रिल रोजी दमण दीवमध्ये मतदान प्रक्रिया पार पडेल आणि निकाल सर्व निकालांसोबतच म्हणजे 23 मे रोजी लागेल.
कालच (21 मार्च) भाजपने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात एकूण 182 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मत्री नितीन गडकरी यांच्यासह दिग्गज भाजप नेत्यांची नावं पहिल्या यादीत आहेत. तसेच, महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची घोषणा भाजपने पहिल्या यादीत केली. पहिल्या यादीत भाजपने दोन विद्यमान खासदारांना डच्चू दिला आहे.
BJP releases 2nd list of candidate for upcoming Lok Sabha elections – Lalubhai Patel to contest from Daman & Diu Parliamentary constituency. The voting for the constituency will be held on 23rd April in the 3rd phase of polling. pic.twitter.com/GsT37uknlm
— ANI (@ANI) March 21, 2019
निवडणुकीच्या तारखा जाहीर :
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.
महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.
संबंधित बातम्या :
मोदींसह भाजपचे ‘हे’ चार दिग्गज नेते कुठून लढणार?
भाजपच्या पहिल्या यादीत दोन विद्यमान खासदारांना डच्चू
भाजपच्या पहिल्या यादीमुळे महाराष्ट्रातील दोन रोमहर्षक लढती निश्चित
पहिल्या यादीतून अडवाणींना डच्चू, गांधीनगरमधून ‘या’ बड्या नेत्याला संधी