राष्ट्रवादीनं ‘त्या’ 22 नगरसेवकांची यादी जाहीर करावी, भाजपचं आव्हान; कलानींचं स्पष्टीकरण काय?

पप्पू कलानी जेलबाहेर आल्यानंतर कलानी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेत टीम ओमी कलानी राष्ट्रवादीत विलीन केली. तसंच टीम ओमी कलानीच्या भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या 22 नगरसेवकांनी ठाण्यात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करत मोठी खळबळ उडवून दिली.

राष्ट्रवादीनं 'त्या' 22 नगरसेवकांची यादी जाहीर करावी, भाजपचं आव्हान; कलानींचं स्पष्टीकरण काय?
उल्हासनगरमधील कलानी गटातील नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 3:10 PM

ठाणे : उल्हासनगरातील टीम ओमी कलानीच्या भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या २२ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत भाजपला धक्का दिला होता. यानंतर हा प्रवेश खोटा असल्याचा आरोप भाजपनं केलाय. उल्हासनगर महापालिकेच्या मागील निवडणुकीत टीम ओमी कलानीचे 22 नगरसेवक भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते. पप्पू कलानी जेलबाहेर आल्यानंतर कलानी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेत टीम ओमी कलानी राष्ट्रवादीत विलीन केली. तसंच टीम ओमी कलानीच्या भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या 22 नगरसेवकांनी ठाण्यात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करत मोठी खळबळ उडवून दिली. (BJP challenges Omi Kalani to announce names of 22 corporators From Ulhasnagar who joined NCP)

दरम्यान हे प्रवेश प्रत्यक्ष नगरसेवकांचे झालेले नसून नगरसेवकांच्या पती किंवा पत्नी यांचे आहेत. त्यामुळे हे प्रवेश खोटे असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते प्रदीप रामचंदानी यांनी केला आहे. जर भाजपच्या 22 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असेल, तर राष्ट्रवादीनं अधिकृत लेटरहेडवर या नगरसेवकांची यादी जाहीर करावी, अन्यथा महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी रामचंदानी यांनी केली आहे.

ओमी कलानींना भाजपला इशारा

या सगळ्याबाबत टीम ओमी कलानीचे प्रमुख आणि पप्पू कलानी यांचे सुपुत्र ओमी कलानी यांना विचारलं असता, पक्षांतर बंदी कायद्यामुळे प्रत्यक्ष नगरसेवकांनी प्रवेश केलेला नाही. नगरसेवकांचे पती किंवा पत्नी यांनी प्रवेश केलाय. त्यामुळे नगरसेवकही आपसूकच राष्ट्रवादीत आले असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. तसंच प्रदीप रामचंदानी हे स्वतः महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक आहेत. मात्र, पुढच्या निवडणुकीत ते स्वीकृत नगरसेवक होतील, इतकंही संख्याबळ भाजपचं नसेल. आम्ही कलानी आहोत, कुणाला घाबरत नाही, असा थेट इशारा ओमी कलानी यांनी दिला आहे.

पुढील निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता, कलानी गटाला विश्वास

उल्हासनगर शहरात ‘जिथे कलानी, त्यांचीच सत्ता’ हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. गेल्या निवडणुकीतही कलानी समर्थक नगरसेवक भाजपच्या तिकिटावर निवडून आल्यानं महापालिकेवर भाजपची सत्ता आली होती. मात्र, विधानसभेत कलानी परिवाराला भाजपचं तिकीट मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला पाठींबा देत भाजपची सत्ता अक्षरशः खेचून घेतली होती. त्यामुळे पुढच्या निवडणुकीतही याच सूत्रानुसार राष्ट्रवादीची सत्ता महापालिकेवर येईल, असा विश्वास कलानी गटाकडून व्यक्त केला जातोय.

पप्पू कलानींच्या सुनेसह 22 नगरसेवकांच्या हाती ‘घड्याळ’

माजी आमदार पप्पू कलानी यांच्या सूनबाई आणि उल्हासनगर महापालिकेच्या माजी महापौर पंचम ओमी कलानी यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर टीम कलानीच्या 22 नगरसेवकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत 27 ऑक्टोबर रोजी ठाण्यात हा पक्षप्रवेश झाला.

पंचम कलानी या तांत्रिकदृष्ट्या भाजपच्या चिन्हावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. आता राष्ट्रवादी प्रवेशापूर्वी पंचम कलानी यांनी उल्हासनगरचे महापालिका आयुक्त राजा दयानिधी यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. टीम ओमी कलानीच्या भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या 22 नगरसेवकांनी हातावर ‘घड्याळ’ बांधले आहे.

उल्हासनगर महापालिकेवर आता राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केला. कलानी परिवाराच्या प्रवेशामुळे शहरात पक्षाला बळ मिळेल, असंही आव्हाड म्हणाले. कलानी गटाचे 22 आणि इतर 10 अशा 32 नगरसेवकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला आहे.

इतर बातम्या :

Diwali Festival : पुण्यात 125 डेसीबलपेक्षा जास्त आवाजाचे साखळी फटाके वाजवण्यास बंदी

Video : सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस! खासदार उदयनराजे म्हणतात, ‘गरीब शेतकरी सभासदांची जिरवू नका’

BJP challenges Omi Kalani to announce names of 22 corporators From Ulhasnagar who joined NCP

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.