उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येऊ नये ही भाजपची इच्छा? वाचा सविस्तर…

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येऊ नये ही भाजपची इच्छा?

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येऊ नये ही भाजपची इच्छा? वाचा सविस्तर...
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 2:57 PM

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एकत्र यावं अशी इच्छा शिवसेनेच्या तसंच शिंदे गटाच्या काही नेत्यांनी बोलून दाखवली. पण या दोन नेत्यांचं मनोमिलन घडू नये, अशी भाजपची इच्छा असल्याची माहिती आहे. शिंदे यांनी पुन्हा ठाकरेंसोबत जाणे भाजपला पसंत नसल्याची माहिती मिळतेय. शिवसेनेत फूट पाडून एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्रिपदी विराजमान केलं. शिंदे यांच्या नेतृत्वात त्यांचा गट आणि भाजप अशी युती करून 2024 लोकसभा, विधानसभा निवडणुका जिंकाव्यात, अशी रणनीती भाजपने आखली असल्याची माहिती आहे. ठाकरेंच्या गटातील नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अश्यात आता शिंदे यांनी मागे फिरत पुन्हा ठाकरेंकडे जाणं भाजपला मान्य नसल्याचं बोललं जात आहे.

भाजपला शिंदे-ठाकरे मनोमिलन नको?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं अशी इच्छा शिवसेनेच्या तसंच शिंदे गटाच्या काही नेत्यांनी बोलून दाखवली. पण या दोन नेत्यांचं मनोमिलन घडू नये, अशी भाजपची इच्छा असल्याची माहिती आहे. शिंदे यांनी पुन्हा ठाकरेंसोबत जाणे भाजपला पसंत नसल्याची माहिती मिळतेय.

हे सुद्धा वाचा

लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या 19 जुलै रोजी शपथविधीचा हा सोहळा रंगणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 18 जुलै रोजी राष्ट्रपदीपदासाठीची निवडणूक होणार असून त्याच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. शिंदे गटातील शिवसेना आणि भाजपच्या सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाची स्थापना कधी होणार, याच्या प्रतिक्षेत अवघा महाराष्ट्र होता. महाराष्ट्रात मोठ्या नाट्यमय घडामोडींनंतर स्थापन झालेल्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी अनेक आमदारांचे प्रयत्न सुरु आहेत. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यातही अनेक बैठका झाल्या. त्यामुळे महाराष्ट्रातील खातेवाटप कधी होतंय, कोणतं खातं कुणाला मिळेल, याचे आडाखे बांधले जात होते. अखेर 19 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होईल, यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.