आशिष शेलारांनी महापालिका निवडणुकीचं शंख फुंकलं, BMC वर झेंडा फडकवण्याची तयारी सुरु

भाजपने आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली असल्याची माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे.

आशिष शेलारांनी महापालिका निवडणुकीचं शंख फुंकलं, BMC वर झेंडा फडकवण्याची तयारी सुरु
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 2:02 PM

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये (bihar assembly election) भाजपच्या विजयामुळे (Bjp Won) महाराष्ट्रातही भाजप नेत्यांना बळ मिळाल्याचं पाहायला मिळतं आहे. भाजपने आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation elections) तयारीला सुरूवात केली असल्याची माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली. महापालिका निवडणुकीत आम्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकारने केलेलं काम घेऊन जनतेपर्यंत जाणार आहोत. मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार असून देवेंद्र फडणवीस हे पालिका निवडणुकांवर लक्ष ठेवून असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली. (bjp leader ashish shelar criticized on shivsena and congress in bihar assembly election)

यावेळी बोलताना त्यांनी बिहार निवडणुकीतल्या पराभवावरून शिवसेनेला चिमटे काढले. शिवसेनेचा मतदार हा शिवसेनेला महापालिका निवडणुकीत सोडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही असेच सोबत रहा, येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमचा पराभव करणार हे बिहारच्या आकड्यावरून स्पष्ट होतं अशी टीका आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केली.

स्वबळावर लढणार पालिका निवडणूक आशिष शेलार यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना, आम्ही स्वबळावर सर्व महापालिका निवडणूक लढवणार आणि लोकांचा आशीर्वाद नक्की मिळवणार असा ठाम विश्वास व्यक्त केला. मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीत लागलो आहोत. देवेंद्र फडणवीस हे महापालिका निवडणुकीकडे बारीक लक्ष ठेऊन आहेत. तर सगळी रणनीती आजच ओपन करण्याची आवश्यकता नाही असंही शेलारांनी म्हटलं.

शेलारांचा शिवसेनेवर घणाघात विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेनं बिहारमध्ये 23 जागांवर उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीसाठी शिवसेनेला ‘तुतारी वाजवणारा मावळा’ हे चिन्ह मिळालं होतं. त्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी हिरीरीने प्रचारही केला होता. मात्र, एकूण 23 जागांपैकी 21 जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली होती. यावरून शेलारांनी शिवसेनेला टार्गेट केलं. (bjp leader ashish shelar criticized on shivsena and congress in bihar assembly election)

मुंबई महापालिका निवडणुकांचे आकडे जेव्हा समोर येतील तेव्हा शिवसेनाला फक्त 20-25 जागा कशा मिळाल्या यावर अग्रलेख तयार ठेवावा अशा शब्दात आशिष शेलारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. इतकंच नाही तर बिहारच्या निवडणुकांचं शिवसेनेनं नक्कीच आत्मपरीक्षण करू नये आणि सर्वांनी आनंदात रहावं असाही खोचक टोला यावेळी शेलारांनी लगावला.

‘काँग्रेस आणि शिवसेनेच्या युतीला धन्यवाद’ मुस्लिम बहुल मतदार संघात मतदारांनी काँग्रेसला मतदान केलं नाही. त्याचं कारण महाराष्ट्रात काँग्रेसने  बिहारच्या मुस्लिमांना झिडकारलं. काँग्रेसने महाराष्ट्रत शिवसेनेशी केलेली सलगी पटली नाही म्हणून काँग्रेसचा आकडा कमी आल्याचं विधान आशिष शेलार यांनी केलं. तर काँग्रेस आणि शिवसेनेच्या युतीला धन्यवाद. ही युती अशीच चालू ठेवा. मुंबई महापालिका निवडणुकीत डिपॉजीटसुद्धा राहील की नाही अशी स्थिती असणार असल्याचा इशारा यावेळी आशिष शेलार यांनी दिला. दरम्यान, यावर आता शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

इतर बातम्या – 

शिवसेनेच्या बड्या नेता स्वगृही परतणार, वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

बिहारमध्ये शिवसेनेचं डिपॉझिटच जप्त; आता कुठे गेला उद्धव ठाकरे आणि राऊतांचा चमत्कार: किरीट सोमय्या

bjp leader ashish shelar criticized on shivsena and congress in bihar assembly election

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.