मुख्यमंत्र्यांच्या भाषणात भाजपची दहशत याचाच आनंद; शेलारांची खोचक टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्या निमित्त केलेल्या भाषणातून केवळ जळफळाट दिसून आला. त्यात काही नवीन नव्हतं, असं सांगतानाच या भाषणात भाजपची दहशत होती याचाच आनंद झाला, अशी खोचक टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात भाजपची दहशत याचाच आनंद; शेलारांची खोचक टीका
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 4:02 PM

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्या निमित्त केलेल्या भाषणातून केवळ जळफळाट दिसून आला. त्यात काही नवीन नव्हतं, असं सांगतानाच या भाषणात भाजपची दहशत होती याचाच आनंद झाला, अशी खोचक टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. (bjp leader ashish shelar reaction on cm uddhav thackerays dussehra rally speech)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात भाजपवर जोरदार टीका केली होती. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या टीकेचा समाचार घेतला. आम्ही खऱ्या अर्थाने हिंदू संस्कृती जपणारे आहोत. दसऱ्याच्या दिवशीही कुणाचंही वाईट चिंतू नये, वाईट बोलू नये अशी आपली परंपरा आहे. आम्ही ही परंपरा जपतो, असं सांगतानाच काल त्यांनी मात्र या परंपरेला तडा दिला. त्यांच्या संपूर्ण भाषणात जळफळाट होता. या भाषणात भाजपचीच दहशत पाह्याला मिळाली. याचा आम्हाला आनंद आहे. अर्णव गोस्वामी आणि कंगना रनौतने जी काय वाट लावली, त्याचं दडपण या भाषणात होतं. हे भाषण म्हणजे ओटीटीवरचा महा फ्लॉप शो होता, असा खोचक टोला शेलार यांनी लागवला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्वाची मांडलेली व्याख्या म्हणजे त्वचा आहे. तर शिवसेनेचं हिंदुत्व ही शाल आहे. सत्तेसाठी पांघरलेली ही शाल आहे. शाल आणि त्वचेची तुलना होऊच शकत नाही. उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व हे भेसळयुक्त झालं आहे. त्यांना हिंदुत्वासाटी आमच्याकडून सर्टिफिकेट घ्यावं लागेल. एवढेच नव्हे तर काळ्या टोपीकडूनही घ्यावं लागेल, असं सांगतानाच टाळ्या आणि थाळ्यांचा हिंदुत्वाशी काहीच संबंध नव्हता. कोरोना योद्ध्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून केलेली ती कृती होती, असंही ते म्हणाले. (bjp leader ashish shelar reaction on cm uddhav thackerays dussehra rally speech)

संबंधित बातम्या:

आमचं हिंदुत्व म्हणजे त्वचा, शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे सत्तेसाठी पांघरलेली शाल- आशिष शेलार

परत फिरा रे! खडसेंच्या प्रवेशानंतर अनिल गोटे आशावादी, भाजपवासी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत परतण्याचे आवताण

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.