बारामतीत भाजपच्या गोटात मोठं काहीतरी घडतंय, तब्बल 52 शाखांचं उद्घाटन, ‘पवार’ कुटुंबाला चॅलेंज

उद्धव ठाकरे यांची आज मालेगावात सभा आहे. या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. तर दुसरीकडे बारामतीतही मोठ्या घडामोडी घडत आहेत. बारामतीत आज चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते तब्बल 52 शाखांचं उद्घाटन होणार आहे.

बारामतीत भाजपच्या गोटात मोठं काहीतरी घडतंय, तब्बल 52 शाखांचं उद्घाटन, 'पवार' कुटुंबाला चॅलेंज
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 6:16 PM

पुणे : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग येण्याची शक्यता आहे. प्रत्येक पक्ष आता कामाला लागला आहे. प्रत्येकाला आगामी निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागांवर निवडून यायचं आहे. त्यासाठी प्रत्येक पक्ष कंबर कसताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना आणि भाजपचा सामना करण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकीने पुढच्या निवडणुकांना सामोरं जाण्याची रणनीती आखताना दिसत आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून लोकसभेच्या संपूर्ण 48 जागांसाठी तयारी केली जात आहे. विशेष म्हणजे भाजपकडून बारामती मतदारसंघासाठी जोरदार तयारी केली जाताना दिसत आहे.

आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धूळ चारण्यासाठी भाजपकडून गेल्या अनेक दिवसांपासून ‘मिशन बारामती’ सुरु करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बारामती हा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या मतदारसंघात मेहनत घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला तर हा संपूर्ण पक्षासाठी धक्का मानला जाऊ शकतो. विशेष म्हणजे निवडणुकीत पवार कुटुंबातील सदस्य उमेदवार असेल आणि त्या उमेदवाराचा पराभव करण्यात भाजपला यश मिळालं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचंही खच्चिकरण होईल, असा भाजपचा प्लॅन असल्याचा चर्चा आहे. पण त्यांचा हा प्लॅन कितपत यशस्वी होईल, याबाबत शाश्वती नाही.

बारामतीत तब्बल 52 भाजप शाखांचं उद्घाटन

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती मतदारसंघासाठी चांगलीच कंबर कसली आहे. ते आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते तब्बल 52 भाजप पक्षाच्या शाखांचं उद्घाटन करण्यात येणार आहे. याशिवाय बावनकुळे यांची इंदापुरात आज संध्याकाळी जाहीर सभा देखील आयोजित करण्यात आली आहे. त्यांच्या दौऱ्याला बारामतीच्या सांगवीपासून सुरुवात होणार आहे. बावनकुळे सांगवीत नीरा नदी प्रदूषणाची पाहणी करणार आहेत.

चंद्रशेखर बावनकुळेंच अजित पवारांना थेट आव्हान

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना थेट चॅलेंज दिलं आहे. अजित पवार यांना निवडणुकीत माझं डिपॉझिट जप्त करायचं असेल तर ते माध्या कामठी मतदारसंघात निवडणूक लढायला येतील, असं चॅलेंज बावनकुळे यांनी दिलंय. “अजित पवार आणि त्यांच्या सरकारने जे काही दिलं नाही ते सगळं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी दिलंय. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस फक्त घोषणावीर नाहीत. 2024 ला सगळ्यांना कळेल, आम्ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जिंकू”, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा विचार बदलवून टाकला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा विचार त्यांनी स्वीकारला आहे. मतांच्या लांगुलचालनासाठी ते हे करत आहेत. मात्र त्यांना अनेकजण सोडून गेले हे आपण पाहिलं आहे. आता तर पतन झाल्याशिवाय राहणार नाही”, असा घणाघात बावनकुळे यांनी केला.

“संजय राऊत सातत्याने शिवराळ भाषा वापरतात. ती भाषा महाराष्ट्राला आवडत नाही. उद्धव ठाकरेंची आम्हाला धास्ती नाही आणि कशाकरता घ्यायची? जेव्हा आम्ही वेगवेगळे 2014 ला लढलो तेव्हा 124 जागा निवडून आणल्या होत्या. निवडणुकीला अजून वेळ आहे”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापुरात जाहीर केलंय. आम्ही संपूर्ण 48 जागांसाठी लोकसभेची तयारी करतोय. शिवसेना आणि भाजपा 200 पेक्षा जास्त जागा विधानसभेत निवडून आणेल. आमचा आणि शिवसेनेचा जागा वाटप फॉर्म्युला ठरलेला नाही”, अशी भूमिका बावनकुळे यांनी मांडली.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.