निवडणुका रद्द करा, चंद्रशेखर बावनकुळेंचं निवेदन, निवडणूक आयुक्त म्हणाले, आता निवडणुका थांबणार नाहीत!
सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द केलं आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाने पाच जिल्हा परिषदा आणि 33 पंचायत समित्यांमधील रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे.
राहुल झोरी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : जिल्हा परिषदेच्या निवडणुका रद्द कराव्यात या मागणीसाठी भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (BJP leader Chandrashekhar Bawankule) यांनी निवडणूक आयुक्त मदान (election commissioner UPS Madan) यांची भेट घेतली. सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द केलं आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाने पाच जिल्हा परिषदा आणि 33 पंचायत समित्यांमधील रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुका रद्द करण्याची मागणी भाजपने केली आहे. (BJP leader Chandrashekhar Bawankule meet election commissioner demands cancel ZP election till OBC reservation issue get solved )
याबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटल्याशिवाय जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेऊ नका, या मागणीसाठी आम्ही यूपीएस मदान यांना भेटलो. मात्र तरीही या निवडणुका थांबणार नाही असंच सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबत त्यांना निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत”.
ठाकरे सरकारने कोर्टात जावं
मुख्य आयुक्तांना या निवडणुका घेऊ नका म्हणून सांगितलं आहे. याच धर्तीवर जर महाराष्ट्र सरकार कोर्टात गेलं तर या निवडणुका थांबू शकतात. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सीताराम कुंटे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करावी. तरच या निवडकणुका थांबवता येतील, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
महाराष्ट्र सरकारला खरंच ओबीसींची चिंता असेल, तर निवडणुकांसंदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा. भाजपकडून 26 जूनला चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन एका दिवसात थांबणार नाही, तर दररोज आंदोलन होत राहतील, असंही बावनकुळेंनी सांगितलं.
जिल्हा परिषद-पं. समिती पोटनिवडणूक
सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यातील ओबीसीचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. रद्द करण्यात आलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 19 जुलै रोजी मतदान होणार असून 20 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
किती जिल्हा परिषद जागांसाठी मतदान होतंय?
धुळे – 15 नंदूरबार – 11 अकोला – 14 वाशिम – 14 नागपूर – 16
नेमक्या किती पंचायत समिती जागांसाठी मतदान?
धुळे – 30 नंदूरबार – 14 अकोला – 28 वाशिम – 27 नागपूर – 31
संबंधित बातम्या
हस्तक्षेप करा अन्यथा आम्ही उग्र आंदोलन करु, देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच आक्रमक आंदोलनाचा इशारा