पुण्याची परिस्थिती हाताबाहेर, मुख्यमंत्र्यांचा दौरा हे उशिरा सुचलेलं शहाणपण, भाजप शहराध्यक्षांची टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गुरुवारी (30 जुलै) पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांचा हा दौरा म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली (BJP leader Jagdish Mulik allegations on CM Uddhav thackeray Pune Visit).

पुण्याची परिस्थिती हाताबाहेर, मुख्यमंत्र्यांचा दौरा हे उशिरा सुचलेलं शहाणपण, भाजप शहराध्यक्षांची टीका
Follow us
| Updated on: Jul 29, 2020 | 4:43 PM

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गुरुवारी (30 जुलै) पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री पुणे जिल्हा आणि विभागाचा कोरोनाचा आढावा घेणार आहेत. मात्र, “मुख्यमंत्र्यांचा हा दौरा म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे”, अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली. “पुण्याची परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा केवळ दिखाव्यासाठी आहे”, असा आरोप जगदीश मुळीक यांनी केला (BJP leader Jagdish Mulik allegations on CM Uddhav thackeray Pune Visit).

“पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असल्यानं राज्य सरकारकडून भेदभाव केला जातोय. महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 200 कोटींचा खर्च केला. मात्र राज्य सरकारने केवळ तीन कोटी रुपयांची मदत केली. मुख्यमंत्र्यांनी केवळ बैठकीचं नाटक न करता 500 कोटींची मदत जाहीर करावी”, असा घणाघात जगदीश मुळीक यांनी केला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“पुण्यात अत्यंत भयानक परिस्थिती आहे. पुणे जिल्ह्यात 50 हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधितरुग्ण आढळले आहेत. मात्र, पुण्यात बेडसुद्धा उपलब्ध होत नाहीत. सरकारने योग्य पद्धतीने पुण्याची परिस्थिती हाताळली नाही. मुख्यमंत्र्यांचं पुण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं”, असा आरोप जगदीश मुळीक यांनी केला.

“पालकमंत्री अजित पवार बैठका घेत आहेत. मात्र, पुण्यात नियोजनपद्धतीन काम करण्याची गरज आहे. राज्य सरकार पुण्याची परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे”, असा आरोप मुळीक यांनी केला (BJP leader Jagdish Mulik allegations on CM Uddhav thackeray Pune Visit).

“सहा महिन्यांनंतर मुख्यमंत्री घराबाहेर पडत आहेत. मुख्यमंत्र्यांनी जनतेत जाऊन धीर देणं गरजेचं होतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य पिंजून काढलं. त्यामुळे लोकांना आजही मुख्यमंत्री हे देवेंद्रजी फडणवीस असल्याचं वाटतं”, असं जगदीश मुळीक म्हणाले.

हेही वाचा : कार्यकारिणीच्या निवडीवरुन नाराज, भाजप कार्यकर्त्याची नड्डा-चंद्रकांत पाटलांना नोटीस

'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.