कपिल पाटलांची भाषणं दोन दिवस यूट्यूबवर ऐकत होतो, पुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराची मिश्किल टिपणी

झालेल्या कार्यक्रमाला दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. काल झालेल्या कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांच्यात चांगलीचं राजकीय चर्चा रंगली होती. राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमानंतर अनेकदा अशा चर्चेला अधिक उधान येतं.

कपिल पाटलांची भाषणं दोन दिवस यूट्यूबवर ऐकत होतो, पुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराची मिश्किल टिपणी
कार्यक्रमादरम्यान बोलत असताना कपील पाटील
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 9:17 AM

मुंबई – ओझर येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अतुल बेनके (atul benake) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) तसेच भाजपा पक्षावर महिला दिनाच्या निमित्ताने ठेवलेल्या कार्यक्रमादरम्यान टिका टिप्पणी केली आणि स्वत:च्या अन् पक्षाचा “बाऊ “करून घेतल्याची चर्चा राजकीय पटलावर आहे. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी पुण्यात नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राची बदनामी केली म्हणून त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. त्याचबरोबर पुण्यात एका ठिकाणी सगळ्यांनी जमून निषेध नोंदविला. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या राजकीय कार्यक्रमावरती टीका देखील केली आहे. पुणे महापालिकेच्या तोंडावर अनेक प्रकल्पांचं नरेंद्र मोदी यांच्याकडून भाजपाने उद्घाटन केले आहे.

अतुल बेनकेंनी घेतली कॅबिनेट मंत्र्याची फिरकी

ओझर येथे कॅबिनेट राज्य मंत्री कपिल पाटील येणार म्हणून मी मुंबईतील आधिवेशन सोडुन कार्यक्रमाच्या ठिकाणी त्याच्या स्वागतासाठी थांबलो होतो. तसेच त्यांची युट्यूब वरील सर्व भाषणे मी दोन दिवस मोबाईलवरती ऐकत होतो असा उल्लेख राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांनी महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान केला. त्यानंतर ते कॅबिनेट राज्यमंत्री कपिल पाटील यांना पुर्वी राष्ट्रवादीत होता, अशाप्रकारची मिश्कील टिपणी करून माननीय कॅबिनेट मंत्र्याची फिरकी घेतली.

कपील पाटलांच्या त्या वाक्यामुळे उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ

मात्र याच वाक्याचा कपिल पाटील यानी धागा पकडत, म्हणाले की “पुर्वी राष्ट्रवादीत होतो, परंतु आता मी भाजपात आल्यावर सुध्दा सर्व राष्ट्रवादीचे आमदार माझी भाषणे फॉलो करतात यापेक्षा जास्त काय सांगू,” असे बोलून त्यांनी उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उडवून दिला. तसेच राष्ट्रवादीला शाब्दिक टोला पण लगावला. भाजपात सर्व सामान्य माणसाला त्याच्या कर्तृत्वावर पदे मिळतात, मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीत नाही मिळत. तिथे कुणाला अगोदर पदे मिळणार ? याची लगेच माहिती समजते. तसे मात्र भाजपात होत नाही इथे कार्यकर्त्यांना त्याच्या कर्तृत्वावर पदे मिळतात व ख-या अर्थाने लोकशाही जपली जाते अशी मार्मिक टिका कपिल पाटील यांनी कार्यक्रमादरम्यान केली.

कार्यक्रमाला दोन्ही पार्टीची लोक उपस्थित 

झालेल्या कार्यक्रमाला दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. काल झालेल्या कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांच्यात चांगलीचं राजकीय चर्चा रंगली होती. राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमानंतर अनेकदा अशा चर्चेला अधिक उधान येतं.

पिंपरी चिंचवड शहरवासियांसाठी मोठी बातमी, येत्या गुरुवार-शुक्रवार पाणी पुरवठ्यावर परिणाम

चंद्रपुरातील सुनेच्या डोक्यावर मिसेस इंडियाचा मुकूट, आता लक्ष्य अमेरिकेकडे

Jhund: नागराजच्या झुंडवर कोर्टात निर्णय, निर्मात्याला 10 लाखाचा दंड, सिनेमा स्थगितीचीही मागणी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.