प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीची कारवाई योग्यच; सोमय्यांकडून समर्थन
"शिवसेनेचा मुखियाही असेच उद्योग-धंदे करतात हे सर्वांना माहीत", अशा शब्दात किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने (Kirit Somaiya Criticize Uddhav Thackeray) केलेल्या कारवाईचं समर्थन केलं आहे. तसेच, त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही थेट हल्लाबोल केला आहे. “शिवसेनेचा मुखियाही असेच उद्योग-धंदे करतात हे सर्वांना माहीत”, अशा शब्दात किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं (Kirit Somaiya Criticize Uddhav Thackeray).
थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला
शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक त्यांच्या परिवारातील अनेक कंपन्यांवर ठिकठिकाणी ईडीने धाडी घातल्या. जर बेनामी कारोबार असेल, बोगस कंपन्या असेल, सरकारी पैसा, भ्रष्टाचाराचा पैसा वळवला असेल, तर कारवाई व्हायलाच हवी. शिवसेना आणि त्यांचे मोठेमोठे नेते त्यांचा जो मुखिया आहे त्यांचा महापरिवारही असेच उद्योग धंदे करत आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. ईडीच्या कारवाईचं स्वागत आहे.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी बेनामी संपत्ती जमवली असेल तर कारवाई व्हायलाच हवी, किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल @KiritSomaiya @PratapSarnaik pic.twitter.com/YmRUqd2QnP
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 24, 2020
सोमय्यांकडून कारवाईचं समर्थन
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सरनाईक यांच्या घरावर ईडीने केलेल्या कारवाईचं समर्थन केलं आहे. सरनाईक यांनी जर बेनामी मालमत्ता जमवली असेल. मनी लॉन्ड्रिंग केली असेल किंवा खोटी कमा केली असेल तर कारवाई झालीच पाहिजे. मीही सरनाईक यांच्या बाबतीत अशा गोष्टी ऐकल्या होत्या, असं सोमय्या म्हणाले.
मी आमदार आहे म्हणून माझ्यावर कारवाई नको, असं म्हणणं योग्य नाही, ही चुकीची लोकशाही होणार. म्हणून लोकशाहीत फुल होमवर्कसह कारवाई होत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
शिवसेनेचे काही नेते मग ते मुंबईतील असो की इतर ठिकाणचे महापालिकेच्या कंत्राटदारांकडून हप्ते घेतात, अशा लोकांवर कारवाई करायला नको का?, असा सवालही त्यांनी केला. मुंबईचे महापौर झोपडपट्टी वासियांचे कार्य ढापतात, जर उद्या न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले, तर असं म्हणाल की मी शिवसेनेची आहे म्हणून कारवाई, पण भ्रष्टाचारी हे भ्रष्टाचारीच असतात. मग तो कोणीही असो. जो माफिया कॉन्ट्रॅक्टरचा पैसा घेत असेल, तर त्याच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने नाही. भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी आणि त्याचं स्वागत आहे, अशी प्रतीक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली.
Maharashtra: Shiv Sena MLA Pratap Sarnaik’s residence and office in Thane are being raided by officials of Enforcement Directorate.
(File pic) pic.twitter.com/dTAbdEwdTn
— ANI (@ANI) November 24, 2020
Kirit Somaiya Criticize Uddhav Thackeray
संबंधित बातम्या :
टॉवर, पार्क, कॉम्प्लेक्स ते संस्कृती दहीहंडी, प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुपचा पसारा नेमका किती?
MLA Pratap Sarnaik ED Raid Live | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर-कार्यालयावर ईडीचे छापे