इथे पण ‘डाव’ साधलाच! कामगिरी अर्जुन तेंडुलकरची, निलेश राणे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने काल आयपीएलच्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. त्याने आयपीएलच्या आपल्या कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली. त्यामुळे देशभरात त्याचं कौतुक होत आहे. पण याच गोष्टीचा धागा पकडत भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.

इथे पण 'डाव' साधलाच! कामगिरी अर्जुन तेंडुलकरची, निलेश राणे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 7:04 PM

मुंबई : राजकारण आणि क्रिकेटचं मैदान या भिन्न गोष्टी आहेत. क्रिकेटमध्ये राजकारण येऊ नये, असं बोलतात. पण आता क्रिकेटपर्यंतही राजकारण आलेलं बघायला मिळतं. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत ते आपल्याला बघायला मिळालंच. विशेष म्हणजे या निवडणुकीत माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्या गटाचा पराभव झालेला आपल्याला बघायला मिळालं. अर्थात जी निवडणूक झाली ती क्रिकेट असोसिएशन आणि खेळाला आणखी समृद्ध करण्यासाठीच पार पडली. याशिवाय मुंबईसह भारतात क्रिकेटची क्रेझ किती आहे ते सर्वश्रूत असं आहे. पण क्रिकेटवरुन नागरिकांच्या भावना किती संवेदनशील असतात ते भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यावरुन बघायला मिळतं.

याशिवाय क्रिकेट जगत आणि राजकीय मंडळींचा संबंध कुठेना कुठे येतोच. आता तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरीवरुन माजी खासदार निलेश राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

हे सुद्धा वाचा

सध्या आयपीएलचं जोरदार सीझन सुरु आहे. या सीझनमध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर प्रत्यक्षात मैदानात खेळताना बघायला मिळतोय. विशेष म्हणजे नुकतंच काल मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद असा रंगतदार सामना बघायला मिळाला. या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने शेवटच्या षटकात विकेट घेतली. ही विकेट अर्जुन तेंडुलकर याची आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीतील ही पहिली विकेट आहे. त्यामुळे अनेकांकडून अर्जुन तेंडुलकरचं कौतुक करण्यात आलं. भाजप नेते निलेश राणे यांनीही अर्जुन तेंडुलकरचं कौतुक केलं. पण यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

निलेश राणे नेमकं काय म्हणाले?

“काल अर्जुन तेंडुलकरने स्वतःच्या हिमतीवर आणि मेहनत करून पहिली विकेट घेतली. सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून संन्यास घेताना मला सांभाळलं. आता अर्जुनला पण सांभाळा असं म्हटलं नव्हतं. कर्तृत्वाला ओळख सांगावी लागत नाही. कामातून दिसत असतं”, असा टोला निलेश राणे यांनी लगावला. निलेश राणे यांनी ट्विटरवर अर्जुन तेंडुलकरचं कौतुक करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

शिवसेना पक्ष काही वर्षांपूर्वी एका निर्णायक क्षणी येऊन ठेपली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांनी नव्या पक्षाची स्थापना केलेली होती. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देखील थकले होते. यावेळी त्यांनी पक्षाची जबाबदारी जाहीरपणे उद्धव ठाकरे यांच्यावर सोपवली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर सभेत लाखो शिवसैनिकांना संबोधित करताना, माझ्या उद्धवला सांभाळा, असं आवाहन केलं होतं.

बाळासाहेब ठाकरे यांच्या या आवाहनाची आठवण आता उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने केली जातेय. कारण ठाकरे यांचा पक्ष फुटला आहे. शिवसेना पक्ष दोन गटात विभागला गेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालं आहे. त्यावरुन टीका करताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनाची आठवण करुन दिली होती. पण त्यावरुन आता निलेश राणे यांनी टीका केली आहे. त्यांच्या टीकेला आता ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.