‘उद्धव ठाकरे लंडनमध्ये अंडरवर्ल्ड डॉन इकबाल मिर्चीला भेटले’, भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

भाजप आमदार नितेश राणे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे लंडनमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा हस्तक इकबाल मिर्चीला भेटले, असा खळबळजनक दावा नितेश राणे यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी या भेटीवर स्पष्टीकरण द्यावं. अन्यथा आपण त्या भेटीचा फोटोदेखील पुरावा म्हणून जाहीर करु, असा इशारा नितेश राणे यांनी दिलाय.

'उद्धव ठाकरे लंडनमध्ये अंडरवर्ल्ड डॉन इकबाल मिर्चीला भेटले', भाजप नेत्याचा खळबळजनक दावा
Follow us
| Updated on: Dec 11, 2023 | 2:39 PM

नागपूर | 11 नोव्हेंबर 2023 : भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटारे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. उद्धव ठाकरे लंडनमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक इकबाल मिर्चीला भेटले, असा धक्कादायक दावा नितेश राणे यांनी केला आहे. इकबाल मिर्ची हा मुंबईच्या 1993 च्या बॉम्ब हल्ल्यातील एक फरार आरोपी आहे. तसेच तो मोठा ड्रग्ज तस्कर आहे. तो युरोपातून ड्रग्ज तस्करीचं काम करतो. तो सध्या इंग्लंडमध्ये असल्याची चर्चा सातत्याने सुरु असते. तो तिथून दाऊदच्या काळ्या दुनियेतलं कामकाज पाहतो. या इकबाल मिर्चीला उद्धव ठाकरे भेटल्याचा आरोप नितेश राणे यांनी केल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे नितेश राणे यांनी फोटो समोर आणू, असा इशारा ठाकरेंना दिलाय. उद्धव ठाकरेंनी खरं सागावं, नाहीतर फोटो समोर आणू, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

“उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबिय एकदा इकबाल मिर्चीला भेटले होते. तुझा मालक लंडनमध्ये जाऊन इकबाल मिर्चीसोबत कांदे-पोहे खात असताना तुला चालतो. मग प्रफुल्ल पटेल यांच्यावर कशाला आरोप करायचे. मग आज येणाऱ्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सगळ्या लोकांनी सांगावं की, इकबाल मिर्ची लंडनमध्ये राहत असताना ते त्याच्यासोबत जेवले होते की नाही? मग पुढचा पुरावा आणि फोटो मी जाहीर करतो”, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

‘आदित्य ठाकरे कदाचित लंडनला जात असतील’

“युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे इतक्या दिवसांनंतर आज अधिवेशनामध्ये दिसलेले आहेत. कदाचित ते लंडनला जात असतील. चुकून फ्लाईट नागपूरला लँड झालं असेल, म्हणून ते चुकून या अधिवेशनामध्ये दाखल झालेत. ठीक आहे. त्यांनी पण काम शिकावं पहावं. अधिवेशनाला येताना ते घाबरतात काय पप्पांना सोबत घेऊन आलेत? याचाच अर्थ ते मुळात घाबरलेले आहेत”, अशी टीका नितेश राणे यांनी केली. “अदित्य ठाकरेंनी 8 जूनला दिशा सालियनसोबत पार्टी केली होती की नाही ते त्याने राज्याला एकदा तरी सांगावं”, असंदेखील नितेश राणे यावेळी म्हणाले.

‘रोहित पवार राजकारणात काय करताय हे कोणालाच माहीत नाही’

नितेश राणे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावरही निशाणा साधला. “रोहीत पवार हे राजकारणातले ऑरी आहेत. ऑरी जसा बॉलीवूडमध्ये काय करतो नेमकं त्याचं काम काय आहे? हे कुणालाच माहीत नाहीय. तसंच रोहित पवार देखील राजकारणात सध्या काय करतात हे कोणालाच माहीत नाहीय. कधी कुठेही दिसतात, कोणासोबतही दिसतात, त्यामुळे ते नेमके कुठे आहेत हे कळायला नको का?”, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.