मी महाराष्ट्रापासून दूर कशी जाईन? : पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांना पक्षश्रेष्ठींकडून राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे (BJP leader Pankaja Munde).

मी महाराष्ट्रापासून दूर कशी जाईन? : पंकजा मुंडे
Follow us
| Updated on: Jul 27, 2020 | 4:42 PM

मुंबई : “मी महाराष्ट्रापासून दूर नाही. मी महाराष्ट्राच्या टीममध्ये तर आहेच, आजही भाजपच्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीत मला पाचरण करण्यात आलं. त्यामुळे मी महाराष्ट्रापासून दूर कशी जाईन? आपलं जे मूळ असतं तिथून आपण दूर जात नाही”, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना दिली (BJP leader Pankaja Munde). पंकजा मुंडे यांना पक्षश्रेष्ठींकडून राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी सोपवली जाणार आहे. त्याबाबतच्या प्रश्नावर पंकजा मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक आज (27 जुलै) पार पडली. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप नेते विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि मंगलप्रभात लोढा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचीत केली (BJP leader Pankaja Munde).

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी सोपवली जाणार असल्याचं बोललं जात आहे. यासाठी लवकरच पक्ष संघटनेमध्ये फेरबदल करुन या सर्व नेत्यांना थेट राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या टीममध्ये स्थान दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय महाराष्ट्र प्रदेशच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली तेव्हा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीदेखील पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी सोपवली जाणार असल्याचं सांगितलं होतं. पण पंकजा या महाराष्ट्राच्या कोअर कमिटीच्या नेहमी सदस्या असतील असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.

“मी महाराष्ट्रापासून दूर जाणार नाही. आपली व्याप्ती जर वाढत असेल आणि वेगवेगळे अनुभव मिळत असतील तर त्यात काही हरकत नाही. पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील. मी महाराष्ट्रभर काम करत आहे. जी जबाबदारी दिली जाईल तिथे योग्य काम करेन. मी सदैव खूश आहे”, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

“मला आतापर्यंत जी जबाबदारी देण्यात आली ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. मी कुणाशीही अलिप्त नाही. मी कोरोनाच्या काळात शिस्त पाळत आहे. गर्दी होऊ नये आणि लोकांना प्रादुर्भाव होऊ नये याची मी खूप काळजी घेत आहे. मी सध्या प्रशासनाला सहकार्य करत आहे. थेट कार्यक्रमाला न जाता मी वर्चुअल कार्यक्रम करत आहे. मला सतत काम करण्याची इच्छा आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

संबंधित बातम्या :

खडसे, तावडे, पंकजा मुंडेंना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी?

Non Stop LIVE Update
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.