Rahul Gandhi Flying Kiss : राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिला; स्मृती ईराणी यांचा गंभीर आरोप

राहुल गांधी यांची फ्लाईंग किस देण्याची कृती चुकीचं असल्याचं सांगत भाजपच्या 22 महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे धाव घेऊन याबाबतची तक्रार केली आहे.

Rahul Gandhi Flying Kiss : राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिला; स्मृती ईराणी यांचा गंभीर आरोप
Smriti IraniImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 2:27 PM

नवी दिल्ली | 9 ऑगस्ट 2023 : भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिला. हा महिलांचा अपमान आहे. महिला खासदारांचा अपमान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे, अशी मागणीच स्मृती ईराणी यांनी केली आहे. 22 महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे धाव घेऊन तक्रारही केली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत भाग घेतला. यावेळी त्यांनी भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. खासकरून मणिपूरच्या हिंसेच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजप सरकारला घेरलं. त्यानंतर मंत्री स्मृती ईराणी या भाषणाला उभ्या राहिल्या. त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार पलटवार केला. स्मृती ईराणी बोलत असताना राहुल गांधी सभागृहाबाहेर पडले. राजस्थानला जाण्यासाठी ते सभागृहाबाहेर पडले होते.

हे सुद्धा वाचा

खासदार हसले म्हणून…

दरम्यान, राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिल्याचा आरोप स्मृती ईराणी यांनी केला. राहुल गांधी हे सभागृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी त्यांनी ही कृती केल्याचं सांगितलं जातं. राहुल गांधी हे लोकसभा परिसरातून बाहेर पडत असताना त्यांच्या काही फायली पडल्या. त्यामुळे या फाईली उचलण्यासाठी राहुल गांधी वाकले असता त्यांना पाहून भाजपचे खासदार हसायला लागले. त्यावर राहुल गांधी यांनी या हसणाऱ्या खासदारांना फ्लाईंग किस दिला आणि तिथून हसत निघून गेले, असं काही लोकांचं म्हणणं आहे.

कॅमेऱ्यात क्षण कैद नाही

राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिला. पण हा क्षण कॅमेऱ्यात कैद झालेला नसल्याचं सांगितलं जात आहे. तर राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस सीसीटीव्हीत कैद झाला असावा, त्यामुळे सीसीटीव्ही चेक करण्यात यावी, अशी मागणी करणअयात आली आहे.

22 महिला खासदारांचं पत्र

राहुल गांधी यांची फ्लाईंग किस देण्याची कृती चुकीचं असल्याचं सांगत भाजपच्या 22 महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे धाव घेऊन याबाबतची तक्रार केली आहे. हा महिलांचा अपमान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर एक महिला विरोधी व्यक्तीच महिला खासदारांना फ्लाईंग किस देऊ शकतो. असा प्रकार यापूर्वी कधी पाहिला नाही. यावरू ते महिलांबाबत काय विचार करतात हे दिसून येतं. ही अभद्र आणि आक्षेपार्ह कृती आहे, अशी टीका स्मृती ईराणी यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.