Sonali Phogat | गोव्यातल्या पार्टीत सोनाली फोगाट यांना ड्रग्ज दिले , 2 तास बाथरुममध्ये ठेवलं, पोलिसांचे धक्कादायक खुलासे, सीसीटीव्ही फुटेज समोर

सोनाली फोगाट यांच्यावर त्यांच्या मूळ गावी हिस्सार येथे आज शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मुलगी यशोधरा यांनी चुलत भावासोबत मिळून सोनाली यांच्या मृतदेहाला अग्नी दिला.

Sonali Phogat | गोव्यातल्या पार्टीत सोनाली फोगाट यांना ड्रग्ज दिले , 2 तास बाथरुममध्ये ठेवलं, पोलिसांचे धक्कादायक खुलासे, सीसीटीव्ही फुटेज समोर
सोनाली फोगाट खून प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज समोरImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 5:23 PM

पणजीः भाजप नेत्या (BJP Leader) सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. सोनाली फोगाट यांच्या दोन सहकाऱ्यांनीच त्यांना एका पार्टीत पेयाद्वारे ड्रग्ज दिल्याचं उघडकीस आलं आहे. गोवा पोलिसांच्या (Goa Police) चौकशीत हा प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे ज्या हॉटेलमध्ये सोनाली फोगाट यांना ड्रग्ज देण्यात आलं, त्या हॉटेलचे दोन ठिकाणचे सीसीटीव्ही फुजेट पोलिसांच्या हाती लागले आहे. यात फोगाट यांचा पीए सुधीर सांगवान याने त्यांना पाण्याच्या बाटलीतून जबरदस्तीने ड्रिंक दिल्याचं दिसतेय. त्यानंतर सोनाली फोगाट यांचं स्वतःवर नियंत्रण राहिलं नाही. इतर सहकाऱ्यांनी त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेल्याचं दिसून येतंय. प्राथमिक तपासात सोनाली फोगाट यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असल्याचा आरोप फोगाट यांच्या कुटुंबियांनी केला होता. त्यानुसार, सोनाली यांच्या दोन सहकाऱ्यांविरोधात गोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना सध्या अटक केली आहे.

आरोपींची कबूली…

सोनाली फोगाट यांच्या मृत्यूनंतर त्यांचा भाऊ रिंकू यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे त्यांचा खून झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सोनाली फोगाट यांचा पीए सुधीर संगवान आणि सुखविंदरसिंह या दोघांनीच सोनाली फोगाट यांचा खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी कसून तपास केल्यानंतर आरोपींनी सोनाली फोगाट यांना ड्रग्ज दिल्याचे कबूल केले आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपी ३०२ कलमा अंतर्गत अटक करण्यात आली असून उद्या त्यांना कोर्टासमोर हजर केलं जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांनी सांगितलेला घटनाक्रम काय?

पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, सोनाली फोगाट यांची हत्या कशी झाली, त्याचा काही घटनाक्रम समोर आलाय. त्यानुसार-

  •  सीसीटीव्ही फुटेजमध्ये गोव्यातल्या हॉटेलमध्ये पार्टीदरम्यान, सुधार सांगवान आणि त्यांचा साथीदार आणि सोनाली हे तिघे दिसतात.
  •  व्हिडिओमध्ये सोनाली यांना जबरदस्तीने बाटलीतून एक ड्रिंक देण्यात आल्याचं दिसलं. सुधीर सांगवान याने पोलिसांच्या चौकशीत, त्यांना ड्रिक्समद्ये ड्रग्स किंवा केमिकल दिल्याचं कबूल केलंय.
  •  हे ड्रिंक प्यायल्यावर सोनाली यांचा स्वतःवर ताबा राहिला नाही. चार-साडे चार वाजता त्यांना तशाच अवस्थेत बाथरुमकडे नेण्यात आलं. तेथे त्या दोन तास होत्या.
  •  दोन तास बाथरुममध्ये हे लोक होते. तेथे नेमकं काय घडलं, याचं उत्तर अद्याप आरोपींनी दिलेलं नाही.
  •  प्राथमिक चौकशीनुसार, सोनाली यांच्या हत्येसाठी हे दोन्ही आरोपी जबाबदार असल्याचं दिसून येतंय.
  •  सोनाली यांच्या शरीरावर काही जखमा दिसून आल्या आहेत. मात्र सोनाली यांचा मृतदेह उचलताना त्या जखमा झाल्याचं आरोपींनी चौकशीत सांगितलंय.
  •  सोनाली फोगाट यांच्यावर बलात्कार करून त्यांचा खून केल्याचा आरोप आरोपींवर केला जातोय. तसेच सोनाली यांच्या संपत्तीवरही आरोपींचा डोळा असल्याचं फोगाट यांच्या भावाने म्हटलंय.

हिस्सारमध्ये अंत्यसंस्कार

दरम्यान, सोनाली फोगाट यांच्यावर त्यांच्या मूळ गावी हिस्सार येथे आज शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मुलगी यशोधरा यांनी चुलत भावासोबत मिळून सोनाली यांच्या मृतदेहाला अग्नी दिला. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस सोडून भाजपात शामिल झालेले कुलदीप बिश्नोई हेदेखील अंत्यसंस्कारावेळी पोहोचले होते.

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.