भाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला
भाजपचा एक तरी आमदार फोडून दाखवा, ते शक्य झालं नाही म्हणून आता दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं मुनंगटीवार म्हणाले. Sudhir Mungantiwar
राहुल झोरी, टीव्ही 9 मराठी, मुंबई: भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या पक्षप्रवेशावरुन टोला लगावला आहे. “मी 16 जानेवारी 2021 ही तारीख दिली होती की भाजपचा एक तरी आमदार फोडून दाखवा, ते शक्य झालं नाही म्हणून आता दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं मुनंगटीवार म्हणाले. नोव्हेंबर महिन्यात निवडणुका आहेतच त्यावेळी भाजपची ताकद दिसेल, असंही ते म्हणाले. (BJP Leader Sudhir Mungantiwar slam opposition parties)
4 आठवड्यांचं अधिवेशन घ्या
राज्यातील 150 विषय आहेत ज्यावर चर्चा होऊ शकते. विधिमंडळाचं अधिवेशन किमान 4 आठवड्यांचे झाले पाहिजे. थातुरमातुर काही दिवसांचे अधिवेशन नको, असं मुनगंटीवार म्हणाले. नवी मुंबईच्या विमानतळाच्या नावावरून संघर्ष होईल अशी भूमिका कोणी घेऊ नये, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.
सरनाईक यांच्या पत्रावर शिवसेनेनं कृती करायचीय
प्रताप सरनाईक यांच्या पत्राबाबत आम्हाला काही मत व्यक्त करायचं नाही. शिवसेनेने आता या पत्राबाबत विचार करून कृती करायची आहे. भाजपाने शिवसेनेसोबत 30 वर्ष साथ दिली. शिवसेनेने आमची युतीत 25 वर्ष सडली, अशी घोषणा केली तरीही आम्ही विचार केला आणि त्यांना सोबत घेतलं. केंद्रीय तपास यंत्रणेमध्ये सुद्धा स्वाभिमानी आधिकारी आहेत ते 25 वर्षांपासून देशाची सेवा करत आहेत. अशा प्रसंगात तपास यंत्रणेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणे योग्य नाही, असंही मुनगंटीवार म्हणाले.
तपास यंत्रणा त्यांचं काम करते
मोदी यांना सीबीआयने ने 9 तास तपासासाठी बोलवले पण त्यांनी कधी विरोधात टीका केली नाही. ही भूमिका असली पाहिजे, तपास यंत्रणा त्यांचे काम करते. काँग्रेस नेते सुरेश कलमाडी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रकरणाचा तपास कोणी केला ? तपासाचा राजकारणशी काहीही संबंध नाही, असही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.
दिल्लीत विरोधी पक्ष एकटवले याबाबत विचारले असता, अशा कितीही बैठका घेतल्या तर त्याचा काहीही उपयोग नाही.जनता कधीच अशांना साथ देत नाही, त्यांना कधीच यश येणार नाही. जिथे या पक्षांची सत्ता आहे तिथे काही करून दाखवा असं मुनगंटीवार म्हणाले.
इतर बातम्या:
Video : मंत्री ‘युसुफखाँ पठाण’ यांच्याकडून शासकीय कार्यालयांची झाडाझडती! कोण आहेत ‘युसुफखाँ पठाण’?
(BJP Leader Sudhir Mungantiwar slam opposition parties)