मोठी बातमी! संजय राऊत यांना भाजपच्या दिल्लीतील ‘या’ बड्या नेत्याचा फोन; दोघांमध्ये काय झाली चर्चा?

यावेळी राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सामील होणार नसल्याचं स्पष्ट केलं. भारत जोडो यात्रेत मी जाणार नाही. मी आजारी आहे.

मोठी बातमी! संजय राऊत यांना भाजपच्या दिल्लीतील 'या' बड्या नेत्याचा फोन; दोघांमध्ये काय झाली चर्चा?
मोठी बातमी! संजय राऊत यांना भाजपच्या दिल्लीतील 'या' बड्या नेत्याचा फोन; दोघांमध्ये काय झाली चर्चा?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 10, 2022 | 12:13 PM

मुंबई: तब्बल तीन महिन्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत हे तुरुंगातून बाहेर आले आहेत. राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर ते तुरुंगातून बाहेर आले आहे. राऊत तुरुंगातून बाहेर येताच एकच जल्लोष करण्यात येत आहे. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत होत आहे. तसेच ठाकरे गटातील नेत्यांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही राऊत यांना फोन करून त्यांचं स्वागत केलं आहे. मात्र, या सर्वात लक्ष वेधून घेणारा एक फोन राऊत यांना आला आहे. भाजपच्या दिल्लीतील बड्या नेत्याने राऊत यांना हा फोन करून त्यांची विचारपूस केली आहे. स्वत: संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली आहे.

संजय राऊत यांना भाजपचे नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामींनी फोन करून त्यांची विचारपूस केली आहे. संजय राऊत यांनीच त्याबाबतची माहिती दिली आहे. मात्र, दोन्ही नेत्यांमध्ये काय बोलणं झालं हे राऊत यांनी सांगितलं नाही.

हे सुद्धा वाचा

मी आता उद्धव ठाकरेंना भेटायला जाणार आहे. आज सकाळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचा फोन होता. तेही आजारी आहेत. त्यांना माझी काळजी होती. मी पवारांना भेटणार आहे. अनेकांचे फोन येत आहे. आता डॉ. सुब्रमण्यम स्वामींचा फोन आला होता, असं राऊत यांनी सांगितलं. राऊत यांना भाजपच्या नेत्यानेच फोन केल्याने तर्कवितर्कही वर्तवले जात आहेत.

दरम्यान, राऊत यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेणार असल्याचं सांगितलं. आपल्यासोबत काय करण्यात आलं याची माहिती देणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं. त्यामुळे राऊत मोदी आणि शहांकडे काय तक्रार करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

यावेळी राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सामील होणार नसल्याचं स्पष्ट केलं. भारत जोडो यात्रेत मी जाणार नाही. मी आजारी आहे. पण याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून निर्णय घेईल, असं ते म्हणाले.

चुकीच्या आरोपाखाली कुणालाही तुरुंगात ठेवणं योग्य नाही. ते चुकीचं आहे. अनिल देशमुख यांच्या बाबत कोर्टाने जे निरीक्षण दिलं ते वाचण्यासारखं आहे. माझ्याबाबत कोर्टाने जे निरीक्षण नोंदवलं तसेच कोर्टाने जो आदेश दिला. त्यावरून कोर्टावरचा विश्वास अधिक वाढला आहे, असं ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.