Vinayak Mete Accident | विनायक मेटेंच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक- भाजपाचे नेते विनोद तावडे
विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील सर्वच नेत्यांचा प्रतिक्रिया येत आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही विनायक मेटेंच्या निधनाचे दुख व्यक्त केले आहे. विनायक मेटे यांच्या निधनाची बातमी कळताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर पनवेलच्या एमजीएम रूग्णालयाचे रवाना झाले आहेत.
मुंबई : शिवसंग्रामचे नेते आणि मराठा समाजाचे बुलंद आवाज विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे आज अपघाती निधन झाले. पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. खोपोली येथील बातम बोगद्याजवळ हा अपघात झाला असून या अपघातामध्ये (Accident) विनायक मेटे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. विनायक मेटे यांच्या निधनाची बातमी ऐकून सर्वांनाचा मोठा धक्का बसलायं. भाजपाचे नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी विनायक मेटे यांच्या निधनाचे दु:ख व्यक्त करत आपल्या भावना मांडल्या आहेत.
भाजपाचे नेते विनोद तावडे म्हणाले की…
विनोद तावडे म्हणाले की, खूपच धक्का बसणारी बातमीयं. राज्यात भाजपाचे सरकार आल्याने मराठा समाजाच्या मागण्या कशा मार्गी लावायच्या याबाबत दिल्लीमध्ये बैठकही झालीयं. विनायक मेटे हे माझे अत्यंत जवळचे मित्र होते. आम्ही सोबत काम केले असून त्यांची समाजासाठी एक वेगळीच तळमळ नेहमीच बघायला मिळायची. मात्र, अशा पध्दतीने ते अचानक जातील असे कधीच वाटले नव्हते. आजही ते मराठा समन्वय समितीची बैठकीसाठी मुंबईकडे येताना त्यांचा अपघात झालायं. खरोखरच आजचे दु:ख हे शब्दामध्ये सांगण्यासारखे नाहीयं.
मराठा समन्वय समितीची बैठकीसाठी मुंबईकडे येत असताना अपघात
विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील सर्वच नेत्यांचा प्रतिक्रिया येत आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही विनायक मेटेंच्या निधनाचे दुख व्यक्त केले आहे. विनायक मेटे यांच्या निधनाची बातमी कळताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर पनवेलच्या एमजीएम रूग्णालयाचे रवाना झाले आहेत. आज मराठा समन्वय समितीची बैठक असल्याने पहाटेच विनायक मेटे हे मुंबईकडे रवाना झाले होते. मात्र, अचानकच एका ट्रकचा आणि मेटेंच्या गाडीचा अपघात झाला.