मराठी भाषा मंत्रालयासमोर भीक मागत उभी आहे, भाजप आमदाराचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

शिवसेनेने (Shiv Sena) मुंबईत जवळपास 30 वर्षे सत्ता गाजवली, पण मुंबईत मराठीची (Marathi) अवस्था बिकट झाली आहे. मराठी माणूस बाहेर फेकला, तशीच अवस्था मराठी शाळांची (Marathi School) आणि भाषेची झाली आहे असा आरोप साटम यांनी केला आहे.

मराठी भाषा मंत्रालयासमोर भीक मागत उभी आहे, भाजप आमदाराचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र
BJP MLA Amit Satam
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 8:55 AM

मुंबई : भाजप आमदार अमित साटम (Amit Satam) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून, मराठी शाळांचा मुद्दा उपस्थित केला आहे. शिवसेनेने (Shiv Sena) मुंबईत जवळपास 30 वर्षे सत्ता गाजवली, पण मुंबईत मराठीची (Marathi) अवस्था बिकट झाली आहे. मराठी माणूस बाहेर फेकला, तशीच अवस्था मराठी शाळांची (Marathi School) आणि भाषेची झाली आहे असा आरोप साटम यांनी केला आहे.

2010-11 मध्ये मराठी शाळांची संख्या 413 होती आणि विद्यार्थी संख्या 1,02,214 होती. आता सन 2020-2021 मध्ये शाळांची संख्या फक्त 280 राहिली आहे तर विद्यार्थ्यांची संख्या फक्त 36,114 इतकी राहिल्याचं साटम यांनी म्हटलं आहे.

अमित साटम यांचं पत्र जसंच्या तसं

मा. उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

महोदय, आपणास ज्ञात असेल की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०७ हुतात्म्यांनंतर दि.१ मे १९६० रोजी मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मुंबईत असलेले हुतात्मा स्मारक आपणास ‘मराठी माणसाने‘ मराठी बाण्यासाठी दिलेल्या बलीदानाची सदैव आठवण करून देत असेलच!

सत्ताधारी सेनेने मराठी आस्मितेचा आधार घेत गेली तीस वर्षे मुंबई महानगर पालिकेत सत्ता आपल्या ताब्यात ठेवली, पण गेल्या तीस वर्षात मुंबईतील मराठी माणूसच मुंबईच्या बाहेर फेकला गेला. हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे गेल्या दहावर्षात मराठी शाळांची संख्या आणि मराठी विद्यार्थ्यांची पटसंख्या निम्म्याहून कमी झाली आहे,याला योगायोगच म्हणावा की मराठीचं नशिब ??

सन २०१० -२०११ मध्ये मराठी शाळांची संख्या ४१३ होती आणि विद्यार्थी संख्या १,०२,२१४ होती. आता सन २०२०-२०२१ मध्ये शाळांची संख्या फक्त २८० राहिली आहे तर विद्यार्थ्यांची संख्या फक्त ३६,११४. मराठी शाळांना सहा-सहा महिने मुख्यध्यापक मिळत नाही. इतकच नाहीतर २०१३ नंतर आवश्यकतेनुसार शिक्षक भरतीही झाली नाही.

आपणास पत्र लिहण्याचे कारण की मला मिळालेल्या माहितीनुसार मराठी भाषेची अशीच अधोगती सुरू राहिली तर २०२७-२०२८ सालापर्यंत मराठी माणसाला आपल्या हक्काच्या मुंबईत आपल्या मुलांसाठी एकही मराठी शाळा उपलब्ध राहणार नाही.

ज्या मायमराठीने गेली ३० वर्ष मुंबई महानगर पालिकेत एकहाती सत्ता शिवसेनेला दिली, त्याच मराठीचे हाल बघून मला कविवर्य कुसुमाग्रज यांचे वाक्य आठवते. “मराठी भाषा मंत्रालयासमोर भीक मागत उभी आहे”.

संबंधित बातम्या 

Maharashtra College Reopen: शैक्षणिक वर्ष 1 नोव्हेंबरला तर कॉलेज दिवाळीनंतर सुरु, उदय सामंतांची माहिती  

…तर तुमची दिवाळी सुखात जाऊ देणार नाही, नवनीत राणा यांचा ठाकरे सरकारला इशारा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.