चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असं हे सरकार, आशिष शेलारांचा हल्लाबोल

महाराष्ट्राचा नेता कसा असेल यापेक्षा महाराष्ट्र कसा असला पाहिजे हा प्रश्न आता महत्वाचा आहे. जनतेच्या मतानं, महाराष्ट्राचं नेतृत्व कुणी केलं पाहिजे हे आधीच स्पष्ट केलं होतं, असं आशिष शेलार म्हणाले.

चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असं हे सरकार, आशिष शेलारांचा हल्लाबोल
Ashish Shelar_Uddhav Thackeray
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 2:31 PM

राहुल झोरी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असं हे सरकार आहे, अशा शब्दात भाजप आमदार आणि माजी मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aaghadi) हल्ला चढवला. भाजप कार्यकारिणीची आज बैठक झाली. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर घणाघात केला. एका पक्षाला आल्याशिवाय पर्याय नव्हता, दुसऱ्या पक्षाचं संपूर्ण राजकारण हे कटकारस्थान करण्यात गेलं आणि तिसऱ्याने आमचा विश्वासघात केला असं हे सरकार आहे, असं शेलार म्हणाले. (BJP MLA Ashish Shelar aatacks on CM Uddhav Thackeray Maha vikas aaghadi govt Maharashtra BJP working committee meet)

महाराष्ट्राचा नेता कसा असेल यापेक्षा महाराष्ट्र कसा असला पाहिजे हा प्रश्न आता महत्वाचा आहे. जनतेच्या मतानं, महाराष्ट्राचं नेतृत्व कुणी केलं पाहिजे हे आधीच स्पष्ट केलं होतं. राज्यभर दौरा करणारा दुसरा नेता कुणीच नाही. अहंकारापेक्षा वैराग्यपूजन आमची भूमिका आहे. इथं अहंकाराचं सरकारच नव्हतं, असं आशिष शेलार म्हणाले.

कोरोनाचे मृत्यू लपवले 

राजावाडी हॅास्पिटलमधील एका तरूणाचे डोळे उंदीर कुरडतात आणि आज त्याचा मृत्यूही झाला. कोव्हिडचे 11500 मृत्यू लपवले. हे महाराष्ट्र मॅाडेल आहे का? तो लसीसाठी काढलेला एक रकमी चेक कुठे गेला? पावसात भिजला का? त्या रकमेचं काय झालं? पुढे असतील तर ते पैसे पॅकेज म्हणून लगेच द्या, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

चेहरा भोळा आणि भानगडी सोळा

मराठा आरक्षणाची बाजू मांडणारे मुकुल रोहतगी यांनी कोर्टात स्पष्टपणे सांगितल की मला पूर्णपणे बाजू मांडण्यास मदत केली नाही. याला जबाबदार कोण? मराठा आरक्षणात झालेली चुक होती की हा ठरवून केलेला कट होता हे तुम्ही आता उत्तर द्यायला हवं. चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असं हे सरकार आहे, असं शेलार म्हणाले.

संबंधित बातम्या 

परमबीर सिंग लेटरबॉम्ब, अजित पवारांचीही सीबीआय चौकशी करा, भाजप कार्यकारिणीत प्रस्ताव

आधी स्वबळाची भाषा, आता दौरा अर्धवट, नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.