BJP MLA Prasad Lad : प्रसाद लाड यांच्या घरासमोर सापडली पैशानं भरलेली बॅग, सोनं, पैसे, चांदीच्या मूर्तीची बॅग
भाजप आमदार आणि नेते प्रसाद लाड यांच्या घरासमोर पैशांनी भरलेली बॅग सापडल्याची माहिती समोर आली आहे. त्या बॅगमध्ये सोनं, चांदी, चांदीच्या मूर्ती, देवांच्या मूर्ती असल्याची माहिती आहे. या घटनेचा तपास पोलीस करता आहेत.
मुंबई : भाजप आमदार आणि नेते प्रसाद लाड (BJP MLA Prasad Lad) यांच्या घरासमोर पैशांनी भरलेली बॅग सापडल्याची माहिती समोर आली आहे. त्या बॅगमध्ये सोनं, चांदी, चांदीच्या मूर्ती, देवांच्या मूर्ती असल्याची माहिती आहे. बॅग कुणी ठेवली, कधी ठेवली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अज्ञातानं ही बॅग प्रसाद लाड यांच्या घरासमोर ठेवली असल्याची माहिती आहे. सुरक्षारक्षकांनी लाड यांना यासंदर्भात माहिती दिली. माटुंगा परिसरात भाजप (BJP) आमदार प्रसाद लाड यांचं घर आहे. ही बॅग पहाटेच्या सुमारास लाड यांच्या घरासमोर सापडली, सुरुवातीला बॅग ही अनोळखी असल्यानं भीतीचं वातावरण होतं. दरम्यान, याप्रकरणी पोलीस (Police) अधिकचा तपास करत आहे. दरम्यान, अशा प्रकारे आमदारांच्या घरासमोर बॅग ठेवल्यानं संशय व्यक्त केला जातंय. दरम्यान, आज आषाढी एकदशी आहे. त्यामुळे अशा प्रकारची बॅग सापडने याकडेही संशयानं बघितलं जातंय.
भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांच्या माटुंगा अथर्वा घराचा बाहेर एक संशयित बॅग सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज सकाळी साडेपाचच्या सुमारास उघडकीस आली. मात्र, प्रसाद लाड यांच्या घराबाहेर सतत असणाऱ्या सुरक्षारक्षकानी या घटनेची माहिती प्रसाद लाड यांना दिली. त्यानंतर प्रसाद लाड यांनी स्वतः पुढकार घेऊन मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधला आणि घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलिसांना एक बॅग मिळालेली आहे. त्या बागेत जुन्या चलनाच्या नोटा, सिक्के आणखीन काही वस्तू सापडल्याची माहिती आहे. मात्र, यापूर्वीही प्रसाद लाड यांच्या घराबाहेर असं संशयित बॅग किंवा वस्तू सापडली होती. जेणेकरून त्यांच्या सुरक्षेला धोका असल्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून प्रसाद लाड यांनी मुंबई पोलिसांना विनंती केलेली आहे की, या परिसरातील सुरक्षा वाढवावी, पोलिसांची गस्त वाढवावी, यामुळे भविष्यात कुठलीही अप्रिय घटना किंवा त्यांच्या सुरक्षेला धोका होऊ नये.
बॅगमध्ये काय?
भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या घरासमोर पहाटे पैशानं भरलेली बॅग सापडली. या बॅगमध्ये सोनं, चांदी, मूर्ती असल्याची माहिती आहे. लाड यांचं घर माटुंगा परिसरात आहे. आमदारांच्या घराला सुरक्षा असताना अशा प्रकारे बॅग सापडनं याकडे संशयानं बघितलं जातंय. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
पोलिसांना तत्काळ माहिती
पहाटे भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या घरासमोर पैशानं भरलेली बॅग सापडताच त्यांनी याप्रकरणाची संपूर्ण माहिती तत्काळ पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण प्रकरण जाणून घेतलं. आता याप्रकरणी तपास सुरू आहे. प्रसाद लाड यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही देखील तपासली जात आहे.
आज आषाढी आणि चोरीची घटना
राज्यात आज आषाढीचा उत्साह आहे. पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक महापूजा केली आहे. तर दुसरीकडे मुंबईत भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या घरासमोर पैशानं भरलेली बॅग सापडली आहे. आषाढीच्या उत्साहात अशा प्रकारे बॅग सापडनं यावरही खुद्द प्रसाद लाड यांनी ‘टीव्ही9 मराठी’ला बोलताना बोट ठेवलंय.