Goa : अमित शाहांचा गोव्यात अक्कलकोटच्या आमदाराच्या साथीनं डोअर टू डोअर प्रचार, सचिन कल्याणशेट्टींवर मयेची जबाबदारी

महाराष्ट्रातील एक आमदार गोव्यात भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळात आहेत. ते सोलापूरमधील अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) हे आहेत.

Goa : अमित शाहांचा गोव्यात अक्कलकोटच्या आमदाराच्या साथीनं डोअर टू डोअर प्रचार, सचिन कल्याणशेट्टींवर मयेची जबाबदारी
सचिन कल्याणशेट्टी
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 1:34 PM

सोलापूर : देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये निवडणुकीसाठी प्रचार सुरु आहे. महाराष्ट्राच्यादृष्टीनं गोवा निवडणूक (Goa Election) महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील बडे नेते गोव्यात तळ ठोकून आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत, भाजपचे (BJP) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या गोव्याचे प्रभारी म्हणून काम करत आहेत. त्यांच्या जोडीला भाजपचे विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर हे देखील आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील काही दिवस गोव्यात प्रचारासाठी गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक देखील गोव्यात प्रचार करत आहेत. यांच्याशिवाय महाराष्ट्रातील एक आमदार गोव्यात भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळात आहेत. ते सोलापूरमधील अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) हे आहेत.

मये विधानसभेची जबाबदारी सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर

गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डोअर टू डोअर प्रचार केला. गोव्यातील मये विधानसभा मतदारसंघात त्यांनी घरो घरी जाऊन नागरिकांना पॅम्प्लेट वाटप केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटचे युवा आमदार सचिन कल्याणशेट्टी हे देखील अमित शाहांसोबत डोअर टू डोअर प्रचार करताना दिसून आले. महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गोवा विधानसभा निवडणुकीचे भाजपचे प्रभारी आहेत. आमदार कल्याणशेट्टी हे फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यातच मये विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराची जबाबदारी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे आहे.

सचिन कल्याणशेट्टी महिनाभरापासून गोव्यात

अमित शाह यांनी मये विधानसभा मतदारसंघात घरोघरी प्रचार केला. त्यांच्यासोबत आमदार कल्याणशेट्टी हे देखील प्रचार करताना पहायला मिळाले. आमदार कल्याणशेट्टी हे आपल्या तीस ते पस्तीस कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मागील महिनाभरापासून गोवा विधानसभेच्या प्रचारासाठी ठाण मांडून आहेत. त्यातच गृहमंत्री अमित शहांसोबत प्रचार करण्याची संधी त्यांना मिळाल्याने कल्याणशेट्टी गटात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

इतर बातम्या:

Video : पुरणपोळी आणि नळीचं नाव महाराष्ट्राबाहेर नेल्यास तुमचा अभिमान वाटेल, धनंजय मुंडे यांचं तरुणाईला आवाहन

Nashik | दुष्काळी येवल्याची सिंचन क्षमता वाढणार; 21 योजनांचा मार्ग मोकळा, किती निधी मंजूर?

BJP MLA Sachin Kalyanshetti present in goa for election campaign with Amit Shah

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.