भाजप आमदाराची दादागिरी, अजित पवार यांच्यासमोर पोलिसाच्या कानशिलात लगावली

Ajit Pawar and Bjp mla sunil kambale | पुणे येथे अजित पवार यांचा दौरा सुरु आहे. या दौऱ्यात भाजप आमदार सुनील कांबळे यांची दादागिरी दिसून आली. सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास मारहाण केली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यास मारले.

भाजप आमदाराची दादागिरी, अजित पवार यांच्यासमोर पोलिसाच्या कानशिलात लगावली
Follow us
| Updated on: Jan 06, 2024 | 8:27 AM

योगेश बोरसे, पुणे, दि. 5 जानेवारी 2024 | राज्यात महायुतीचे सरकार आहे. भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सरकारमध्ये आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार याच्या दादागिरीचे किस्से अधूनमधून समोर येत असतात. परंतु आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासमोरच भाजप आमदाराचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भाजप आमदार सुनील कांबळे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास मारहाण केली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना घडली. पुणे येथील ससून रुग्णालयातील तृतीय पंथीय वार्डाचे उद्घाटन कार्यक्रमात हा प्रकार घडला. या कार्यक्रमास अजित पवार, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे यांच्यासह काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर उपस्थित होते.

कोनशिलेवर नाव नाही, यामुळे केली मारहाण

भाजप आमदार सुनील कांबळे यांची दादागिरी शुक्रवारी पुन्हा एकदा समोर आली. ससून रुग्णालयाच्या कोनशिलेवर आपले नाव नाही यामुळे कांबळे यांना राग आला. त्यांनी आपला संताप व्यासपीठावरुन खाली उतरताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर काढला. राष्ट्रवादीचे वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जितेंद्र सुरेश सातव यांनी त्यांनी मारहाण केली. तसेच यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्यास त्यांनी मारहाण केली. ज्या पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केली त्याची माहिती मिळाली आहे. हा कार्यक्रम ससून रुग्णालयाच्या प्रशासनाकडून कार्यक्रम ठेवला होता.

हे सुद्धा वाचा

सुनील कांबळे यांच्या अडचणी वाढणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर राष्ट्रवादी पदाधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यास सुनील कांबळे यांनी मारहाण केली. यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. कार्यक्रम संपल्यावर एकाच्या कानशिलात त्यांनी लागवल्याची गंभीर दाखल अजित पवार यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे या प्रकरणात त्यांच्याकडून भाजप आमदार सुनील कांबळे बाबत गंभीर भूमिका घेतली जाणार आहे. सुनील कांबळे आणि वाद हा नवीन विषय नाही. यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या एक वरिष्ठ महिला अधिकारी सुष्मिता शिर्के यांना शिवीगाळ केल्याची ऑडियो क्लिप चांगलीच व्हायरल झाली होती. त्यांनी महिला अधिकाऱ्यास घाणेरडया भाषेत शिवीगाळ केली होती.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.