Ekanath Shinde : भाजप आमदारांना मुंबई येण्याचे आदेश, राजकीय घडामोडींना वेग, सत्तास्थापनेची भाजपकडून तयारी?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आलाय.

Ekanath Shinde : भाजप आमदारांना मुंबई येण्याचे आदेश, राजकीय घडामोडींना वेग, सत्तास्थापनेची भाजपकडून तयारी?
राजकीय वातावरण तापलंImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 12:26 PM

मुंबई :  एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजप (BJP) आमदारांना मुंबई (Mumbai) येण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. तर यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय. ही सत्तास्थापनेची भाजपकडून तयारी तर सुरू नाहीय ना, असाही प्रश्न सध्या चर्चेत आहे. दरम्यान, आतापर्यंत संख्याबळाचं समीकरण जुळतं का, याकडे सगळ्यांचं लक्ष राहिलेलं होतं. दोन तृतीआंश आमदारांपेक्षा जास्त संख्याबळ हे एकनाथ शिंदेसोबत असणं गरजेचं होतं. 37 हा आकडा एकनाथ शिंदे यांना गाठायचा होता. आता त्यांनी स्वतःच आपल्याकडे 40 आमदार असल्याचं म्हटलंय. यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदेंचा गट सत्तास्थापनेची तयारी तर करत नाहीये ना, असाही प्रश्न सध्या चर्चेत आहेत. यामुळे राज्यात आता येत्या काळात काय घडामोडी होतात, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे.

40 आमदार एकनाथ शिंदेंकडे?

एकनाथ शिंदे यांच्याकडे चाळीस आमदार असल्याचा दावा खुद्द त्यांनीच केला आहे. त्यामुळे राज्यात येत्या काळात मोठ्या घडामोडी घडू शकता. तर दुसरीकडे भाजपकडे देखील मोठ संख्याबळ आहे. आतापर्यंत संख्याबळाचं समीकरण जुळतं का, याकडे सगळ्यांचं लक्ष राहिलेलं होतं. दोन तृतीआंश आमदारांपेक्षा जास्त संख्याबळ हे एकनाथ शिंदेसोबत असणं गरजेचं होतं. 37 हा आकडा एकनाथ शिंदे यांना गाठायचा होता. आता त्यांनी स्वतःच आपल्याकडे 40 आमदार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा हादरा बसलाय. सत्तास्थापनेचा भाजपसोबत दावा एकनाथ शिंदे करतील, अशी शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे यांच्यासोबत कुठल्या जिल्ह्यातले किती आमदार त्यांच्यासोबत आहे. शिंदेंकडे किती संख्याबळ आहे, हे जाणून घेऊय…

ठाणे जिल्हा (7 आमदार)

  1. एकनाथ शिंदे-कोपरी पाचपाखाडी
  2. प्रताप सरनाईक- माजिवाडा
  3. विश्वनाथ भोईर-कल्याण पश्चिम
  4. शांताराम मोरे-भिवंडी
  5. बालाजी किणीकर-अंबरनाथ
  6. गीता जैन-मिरा भाईंदर
  7. प्रकाश सुर्वे-मागाठाणे ————

औरंगाबाद जिल्हा (6 आमदार)

  1. अब्दुल सत्तार-सिल्लोड
  2. संदीपान भुमरे-पैठण
  3. संजय शिरसाट-औरंगाबाद पश्चिम
  4. रमेश बोरणारे-वैजापूर
  5. प्रदीप जैस्वाल-औरंगाबाद मध्य
  6. उदयसिंह राजपूत-कन्नड —————–

रायगड जिल्हा (3 आमदार)

  1. महेंद्र दळवी-अलिबाग
  2. महेंद्र थोरवे-कर्जत
  3. भरत गोगावले-महाड ————-

सातारा जिल्हा (2 आमदार)

  1. शंभूराज देसाई-पाटण
  2. महेश शिंदे-कोरेगाव ——-

सांगली जिल्हा (1 आमदार)

  1. अनिल बाबर-खानापूर ———–

कोल्हापूर जिल्हा (1 आमदार)

  1. प्रकाश आबिटकर-राधानगरी

    ———-

सोलापूर जिल्हा (1 आमदार)

  1. शहाजीबापू पाटील-सांगोला ———–

बुलढाणा जिल्हा (2 आमदार)

  1. संजय गायकवाड-बुलढाणा
  2. संजय रायमुलकर-मेहकर ———–

अकोला जिल्हा (1 आमदार)

  1. नितीन देशमुख-बाळापूर ———-

नांदेड जिल्हा (1 आमदार)

  1. बालाजी कल्याणकर-नांदेड उत्तर ———

पालघर जिल्हा (1 आमदार)

  1. श्रीनिवास वनगा-पालघर ——-

नाशिक जिल्हा (1 आमदार)

  1. सुहास कांदे-नांदगाव ———-

अमरावती जिल्हा (2 आमदार)

  1. बच्चू कडू- अचलपूर
  2. राजकुमार पटेल-मेळघाट ————

मुंबई (1 आमदार)

  1. यामिनी जाधव-भायखळा ———

भंडारा जिल्हा (1 आमदार)

  1. नरेंद्र भोंडेकर-भंडारा ———

जळगाव जिल्हा ( 3 आमदार)

  1. किशोर पाटील-पाचोरा
  2. चिमणराव पाटील-पारोळा
  3. लता सोनवणे-चोपडा ————

उस्मानाबाद जिल्हा (2 आमदार)

  1. ज्ञानराज चौगुले-उमरगा
  2. तानाजी सावंत-भूम परांडा
VIDEO : मराठी समालोचनावरुन हॉटस्टारच्या कार्यालयात धडकले मनसेचे नेते
VIDEO : मराठी समालोचनावरुन हॉटस्टारच्या कार्यालयात धडकले मनसेचे नेते.
परंड्यात एसटी बसचा अपघात, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर बस आदळली
परंड्यात एसटी बसचा अपघात, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर बस आदळली.
त्या 26 पोलीस अधिकाऱ्यांची बदली करा, तृप्ती देसाईंची फडणवीसांकडे मागणी
त्या 26 पोलीस अधिकाऱ्यांची बदली करा, तृप्ती देसाईंची फडणवीसांकडे मागणी.
‘छावा’ सिनेमातील ‘तो’ सीन काढला; मंत्री उदय सामंत यांची माहिती
‘छावा’ सिनेमातील ‘तो’ सीन काढला; मंत्री उदय सामंत यांची माहिती.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी; अपात्र तरी भरला अर्ज,पैसे घेणार रिटर्न?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी; अपात्र तरी भरला अर्ज,पैसे घेणार रिटर्न?.
आधी मारहाण अन् आता दहशत, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर कारवाई होणार?
आधी मारहाण अन् आता दहशत, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर कारवाई होणार?.
मुंबईकरांसाठी मोठी बातमी... मरिन ते वांद्रे सी-लिंक प्रवास 10 मिनिटांत
मुंबईकरांसाठी मोठी बातमी... मरिन ते वांद्रे सी-लिंक प्रवास 10 मिनिटांत.
बेनाम बादशाह vs गद्दारीचा बादशाह, पालकमंत्रीपदावरुन महायुतीत वाद
बेनाम बादशाह vs गद्दारीचा बादशाह, पालकमंत्रीपदावरुन महायुतीत वाद.
राजकीय नेत्यांची मुजोरी अन् पोलिसांवरच शिरजोरी; व्हिडीओ व्हायरल
राजकीय नेत्यांची मुजोरी अन् पोलिसांवरच शिरजोरी; व्हिडीओ व्हायरल.
आरोपी कराडवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवरच डाऊट, दमानियांचा आरोप काय?
आरोपी कराडवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवरच डाऊट, दमानियांचा आरोप काय?.