नारायण राणेंना तातडीने दिल्लीला बोलावणं, केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान निश्चित

उद्या म्हणजेत 7 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपसह अन्य सहयोगी पक्षातील 17 ते 20 राज्यसभा आणि लोकसभा खासदार संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे

नारायण राणेंना तातडीने दिल्लीला बोलावणं, केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान निश्चित
केंद्रीय मंत्री नारायण राणे
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 7:24 AM

नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या कार्यालयातून राणेंना फोन करण्यात आला होता. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात (Union Cabinet Expansion) नारायण राणे यांना स्थान मिळणं जवळपास निश्चित मानलं जात आहे. दिल्लीतील सूत्रांनी ‘टीव्ही9 मराठी’ला यासंदर्भात माहिती दिली आहे. (BJP MP Narayan Rane likely to get Ministry in Union Cabinet Expansion)

राणे-नड्डा यांची भेट होणार

उद्या म्हणजेत 7 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपसह अन्य सहयोगी पक्षातील 17 ते 20 राज्यसभा आणि लोकसभा खासदार संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांचं नाव केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सुरुवातीपासूनच चर्चेत होतं. दिल्लीत राणेंची जे पी नड्डा यांच्याशी भेट झाल्यानंतर यावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

कोणाकोणाची वर्णी लागणार

2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आले. मात्र, दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनी एकदाही मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. परंतु, आता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे, नारायण राणे आणि हिना गावित यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विस्तारात भाजपमधील नेत्यांसह एनडीएच्या मित्र पक्षांनाही स्थान मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

अनेक मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल

शिवसेना, शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडले आहेत. तर लोजपा नेते रामविलास पासवान यांचं निधन झाल्याने मंत्रिमंडळातील त्यांचं पद रिक्त आहे. त्याशिवाय अनेक मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल केला जाण्याची शक्यता आहे.

अपना दल, जेडीयूचा समावेश?

याशिवाय जेडीयू, अपना दलचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत. त्यामुळे अपना दलच्या अध्यक्षा अनुप्रिया पटेल यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची चिन्हे आहेत. नुकतीच पटेल यांनी भाजपचे नेते अमित शहा यांची भेट घेतली होती.

राणे काय म्हणाले?

दरम्यान, भाजप नेते नारायण राणे यांनी काल सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांना त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशाबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी त्यावर हसून प्रतिक्रिया दिली. असं काही घडत असेल तर मी आभार मानतो. तुमच्या तोंडात साखर पडो. अधिकृत पत्रं येत नाही आणि जोपर्यंत शपथ घेत नाही, तोपर्यंत जरा धीर धरा, असं राणे यांनी हसत सांगितलं होतं.

संबंधित बातम्या :

येत्या 7 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार?, राणे, हिना गावित यांचा समावेश होणार?

(BJP MP Narayan Rane likely to get Ministry in Union Cabinet Expansion)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.