शिवराज पाटील यांचा डीएनए शंभर टक्के मुघलांचाच असेल; भाजपच्या ‘या’ नेत्याची खवचट टीका

गीतेचा एक भाग महाभारतात सांगण्यात आला आहे. त्यामध्ये जिहाद आहे. महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाला जिदाहच शिकवला होता, असं शिवराज पाटील म्हणाले होते.

शिवराज पाटील यांचा डीएनए शंभर टक्के मुघलांचाच असेल; भाजपच्या 'या' नेत्याची खवचट टीका
शिवराज पाटील यांचा डीएनए शंभर टक्के मुघलांचाच असेलImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 11:34 AM

नाशिक: जिहाद फक्त कुराणात नाही तर गीतेतही (geeta) आहे, असं विधान काँग्रेसचे (congress) ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी केल होतं. शिवराज पाटील चाकूरकर (shivraj patil chakurkar) यांच्या या विधानाचे पडसाद उमटले आहेत. शिवराज पाटील यांच्या या विधानाशी काँग्रेस सहमत आहे का? असा सवाल राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. आता या वादात भाजपच्या आध्यात्मिक आघाडीनेही उडी घेतली आहे. शिवराज पाटील यांचा डीएनए तपासा. तो मुघलांचाच असेल, अशी खवचट टीका भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.

भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. शिवराजी पाटील चाकूरकर यांचा डीएनए तपासा तो शंभर टक्के मुघलांचाच असेल. हिंदू विरोधी असणाऱ्यांना मोठ्या पदावर बसवण्याचं काम काँग्रेसने केलं आहे, असं आचार्य तुषार भोसले यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

शिवराज पाटील हे महाराष्ट्राच्या नावाल कलंक आहेत. त्यांच्या सगळ्या सरकारी सुविधा काढून घ्या. त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर हाकला, अशी मागणीही तुषार भोसले यांनी केली आहे.

दरम्यान, राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनीही शिवराज पाटील यांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे. शिवराज पाटील यांचं हे विधान काँग्रेसला मान्य आहे का? काँग्रेस त्यांच्या विधानाशी सहमत आहे का? याचा खुलास काँग्रेसने करावा, अशी मागणी उदय सामंत यांनी केली आहे.

शिवराज पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. गीतेचा एक भाग महाभारतात सांगण्यात आला आहे. त्यामध्ये जिहाद आहे. महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाला जिदाहच शिकवला होता, असं शिवराज पाटील म्हणाले होते. शिवराज पाटील यांच्या या विधानाचे पडसाद उमटत असून त्यांचा निषेध नोंदवला जात आहे. दरम्यान, या प्रकरणावर शिवराज पाटील यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.