Breaking : चंद्रकांत पाटील मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार! राज्याच्या राजकारणाला नवं वळण मिळणार?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. गेल्या काही दिवसांत मनसे आणि भाजप नेत्यांमध्ये जवळीक वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार आहे.

Breaking : चंद्रकांत पाटील मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार! राज्याच्या राजकारणाला नवं वळण मिळणार?
Raj Thackeray- Chandrakant Patil File Photo
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 6:51 PM

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीला शह देण्यासाठी राज्यात भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होणार का? असा सवाल विचारला जात आहे. तसे संकेत दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. गेल्या काही दिवसांत मनसे आणि भाजप नेत्यांमध्ये जवळीक वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. (Chandrakant Patil will meet MNS president Raj Thackeray tomorrow)

राज्य ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांकडून करण्यात आलं आहे. तरं राज ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे, असं मनसे नेत्यांकडून सांगितलं जात आहे. दुसरीकडे मधल्या काळात चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांची धावती भेट झाली होती. तेव्हा राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची क्लिप तुम्हाला पाठवतो. त्यात उत्तर भारतीयांबद्दल आपलं काय मत आहे हे स्पष्ट होईल, असं सांगितल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. तर राज यांच्याकडून आपल्याला क्लिप प्राप्त झाल्याचंही पाटील यांनी सांगितलं होतं. दरम्यान, पुणे दौऱ्यावर असताना आपण कुठल्याही क्लिप पाटील यांना पाठवल्या नाहीत. अन्य कुणी आमच्यापैकी पाठवल्या असतील तर मी विचारतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

उद्याची भेट ही केवळ राजकीय विचारांची देवाणघेवाण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आपण भेट घेणार असल्याची माहिती खुद्द चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. उद्या ते राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राजकारणामध्ये एकच गोष्ट कायम राहत नाही. उद्याची भेट ही केवळ राजकीय विचारांची देवाणघेवाण आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. यापूर्वी राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी या दोन्ही नेत्यांची भेट झाली. राज ठाकरे आणि पाटील यांच्यात त्यावेळी 15 मिनिटे चर्चाही झाली. होती. 

माझ्या भूमिका क्लिअर

राज ठाकरे यांनी परप्रांतियांबाबतची भूमिका स्पष्ट केली तर आम्ही युतीबाबत विचार करू, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्याबाबत पुणे दौऱ्यावर असताना राज यांना विचारण्यात आलं. त्यावर, भूमिका क्लिअर काय करायच्या. माझ्या भूमिका क्लिअर आहेत.  माझ्या भूमिका आजपर्यंत मांडल्या त्या अत्यंत स्पष्ट आहेत. त्या देश हिताच्या आहेत आणि महाराष्ट्र हिताच्या आहेत. त्यात प्रत्येक राज्यांनी आपली भूमिका कशी निभावली पाहिजेत. काय काय गोष्टी केल्या पाहिजेत. तुम्ही आमच्यावर आक्रमण करू नका. आम्ही तुमच्यावर आक्रमण करणार नाही. आसाम आणि मिझोराममध्ये सध्या तेच होत आहे, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या :

राज ठाकरे आणि चंद्रकांतदादा एकमेकांना भेटण्याची शक्यता; दोन्ही नेते शासकीय विश्रामगृहात

दोन वर्षात म्हातारी मुलीला भेटली नाही, मुलगी म्हातारीला भेटायला आली नाही, लॉकडाऊनचं काय ते एकदाचं ठरवा: पाटील

Chandrakant Patil will meet MNS president Raj Thackeray tomorrow

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.